Join us  

IPL 2020 : आयपीएलच्या पुढील मोसमात संघ संख्या वाढणार; पाहा कोणाची लॉटरी लागणार

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) सध्या आठ संघ सहभागी आहेत, परंतु आयपीएल 2020 मध्ये ही संघसंख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:52 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) सध्या आठ संघ सहभागी आहेत, परंतु आयपीएल 2020 मध्ये ही संघसंख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या असून 2020मध्ये आयपीएलमध्ये नवीन संघ दिसू शकतो. पुढील मोसमात 10 संघ खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे, परंतु वेळापत्रकाची ताळमेळ आणि दिवस यांचे गणित करता, हे तुर्तास तरी शक्य नाही. पण, पुढील मोसमात एक अतिरिक्त संघ सहभागी होईल आणि 2022पर्यंत आयपीएल ही 9 संघांची स्पर्धा असेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या Future Tours Program (FTP) आणि बीसीसीआय यांच्यातीच चर्चेनुसार आयपीएलच्या सामन्यांची संख्या ही 76 अशी ठरवण्यात आली आहे. त्यामुळे FTP नुसार 2023पर्यंत 9 संघ खेळवता येतील आणि त्यानंतर बीसीसीआय 10वा संघाचा समावेश करेल,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. याच माहितीनुसार बीसीसीआयनं नवीन संघासाठी 2000 कोटींची मुळ किंमत ठरवली आहे. त्यामुळे आता हा नवा संघ कोणता, असेल याची उत्सुकता लागली आहे. सूत्रांनी सांगितले की,''आयपीएलमध्ये संघ खरेदीसाठी अनेक खरेदीदार आहेत. पण, जेव्हा प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा मोजक्यांनाच संधी दिली जाईल.'' 

त्याशिवाय अहमदाबाद येथे होऊ घातलेल्या नवीन सरदार पटेल स्टेडियमवरही आयपीएलचे सामने खेळवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे हा नवीन संघ अहमदाबादचा असण्याची दाट शक्यता आहे. ''अहदाबाद येथील खरेदीदार आहे आणि तेथे आता क्रिकेटचं स्टेडियमही होत आहे. त्यामुळे त्यांच्याकूडन प्रस्ताव आल्यास त्याचा नक्की विचार होईल,''असेही सूत्रांनी सांगितले. आयपीएलची सर्वसाधारण सभा 1 डिसेंबरला होणार आहे, त्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

No Ball साठी अतिरिक्त अंपायर

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020 च्या मोसमाची सुरुवात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे.  2020च्या मोसमात No ball वर लक्ष ठेवण्यासाठी एक अतिरिक्त अंपायर नियुक्त करण्यात येणार आहे. शिवाय उद्धाटन सोहळा न करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.

IPL 2020 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मोठ्या खेळाडूनं केलं रोहित शर्माला Unfollow, पण का?

IPL 2020 : अजिंक्य, अश्विनच्या येण्यानं दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद कोणाकडे? संघानं केली मोठी घोषणा

 

 

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएलबीसीसीआय