Join us

BCCI ने नोव्हेंबर महिन्यात आणखी एक दौरा घुसवला; टीम इंडियाला दोन संघ तयार करावे लागणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:55 IST

Open in App

India's schedule after T20I World Cup 2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध एकूण ५ कसोटी, ८ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामने खेळणार आहे. त्यातच BCCI ने आणखी एका देशाचा दौरा निश्चित केल्याने टीम इंडियाला दोन संघ तयार करावे लागणार आहेत. 

भारतीय संघ या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दोन्ही संघामध्ये ४ ट्वेंटी-२० सामने खेळवले जातील.  या दौऱ्यातील पहिला सामना ८ नोव्हेंबरला किंग्समीड स्टेडियम (डर्बन) येथे होईल, त्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्क (ग्केबेर्हा), १३ नोव्हेंबर रोजी सुपरस्पोर्ट पार्क (सेंच्युरियन) आणि १६ नोव्हेंबर रोजी वँडरर्स स्टेडियम (जोहान्सबर्ग) येथे  सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या दौऱ्यासाठी टीम इंडियाला ट्वेंटी-२०साठी वेगळा संघ आफ्रिकेला पाठवावा लागणार आहे. कारण, १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात तिसरी कसोटी मुंबईत खेळवली जाणार आहे आणि त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी BCCI टीम इंडियाचा ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट संघ पाठवणार आहे. 

भारताचे T20I World Cup 2024 नंतरचे वेळापत्रक- ५ ट्वेंटी- २० वि. झिम्बाब्वे ( अवे) - ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० वि. श्रीलंका ( अवे )- २ कसोटी व ३ ट्वेंटी-२० वि. बांगलादेश ( होम ) - ३ कसोटी वि. न्यूझीलंड ( होम )  - ४ ट्वेंटी-२० वि. दक्षिण आफ्रिका ( अवे ) - ५ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( अवे ) - ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० वि. इंग्लंड- चॅम्पियन्स ट्रॉफी- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय