Join us  

बीसीसीआयचं नाक कापलं; पाऊस नाही तर 'या' कारणांमुळे रद्द झाला पहिला सामना

१०-१२ मिनिटांनी पाऊस थांबत नाही हे पाहताच जिथून गोलंदाजी केली जाते तिथे कव्हर्स टाकण्यात आले. काही वेळाने पाऊस थांबला, पण ज्या ठिकाणी कव्हर्स टाकण्यात आले होते, ती जागादेखील मोठ्या प्रमाणात भिजली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 10:56 AM

Open in App

गुवाहाटी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 पावसामुळे रद्द करण्यात आला. हा सामना रद्द झाल्यावर बीसीसीआयचं नाक कापलं गेलं. कारण काही वाईट कारणांमुळे हा सामना रद्द झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला आणि विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पावसानं एन्ट्री मारली. पावसाच्या दमदार एन्ट्रीनं चाहते निराश झाले. पावसाचा लपंडाव सुरूच राहिला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दोन वेळा पंचांसोबत खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर उतरला. पावणेदहा वाजता जेव्हा विराट कोहली पंचांसोबत खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर आला त्यावेळी तो नाखुश दिसला.

कोहली हा सामना रद्द झाल्यावर नाखुश असल्याचे पाहायला मिळाले. कारण नाणेफेक झाल्यावर हलक्या पावसाला सुरुवात झाली. १०-१२ मिनिटांनी पाऊस थांबत नाही हे पाहताच जिथून गोलंदाजी केली जाते तिथे कव्हर्स टाकण्यात आले. काही वेळाने पाऊस थांबला, पण ज्या ठिकाणी कव्हर्स टाकण्यात आले होते, ती जागादेखील मोठ्या प्रमाणात भिजली होती.

पावसाचे पाणी सुकवण्यासाठी आसाम क्रिकेट असोसिएशनने अशा काही गोष्टींचा वापर केला की, ते पाहता क्रिकेट चाहते नाराज झाले. जर अशी व्यवस्था आंतरराष्ट्रीय सामन्याला असेल तर पावसानंतर सामन्याचे काय होणार, असा सवाल चाहते विचारायला लागले आहेत. त्यामुळेच हा सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआयचे नाक कापले गेल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआय