Join us

मोठी बातमी; IPL बरोबर यूएईत रंगणार महिलांची ट्वेंटी-20 चॅलेंज लीग, सौरव गांगुलीनं दिले संकेत

आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल यांच्यात आज बैठक होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 13:00 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आयोजनाच्या दृष्टीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल यांच्यात आज बैठक होणार आहे. आयसीसीनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द केल्यानंतर आयपीएलच्या 13व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे यंदाची आयपीएल खेळवण्यात येणार आहे आणि त्यासाठी बीसीसीआय व यूएई क्रिकेट यांच्यात चर्चाही झाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती केंद्र सरकारच्या परवानगीची. त्याच दृष्टीनं आज बैठकीचं आयोजित केलं असून यात खेळाडूंच्या सुरक्षिततेवरही चर्चा होणार आहे. पण, तत्पूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं मोठे संकेत दिले.

आयपीएल सोबतच यूएईत महिला आयपीएल किंवा महिला ट्वेंटी-20 चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्याच्या विचारात असल्याचे गांगुलीनं सांगितले. पुरुषांची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8/10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत होणार असल्याचे गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केलं होतं. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात महिला ट्वेंटी-20 लीग खेळवण्याची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बीसीसीआयनं पीटीआयला सांगितले. तो म्हणाला,''महिला आयपीएल होणार असल्याची मी पुष्टी देतो आणि राष्ट्रीय संघासाठीही आमच्याकडे योजना आहे.''

बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीला सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. 26 जुलैला गांगुलीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. गांगुली अध्यक्षपदावर कायम रहावा यासाठी बीसीसीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. तोपर्यंत गांगुली या पदावर कायम राहणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंही महिला आयपीएलच्या वृत्ताला दुजोरा दिला.''महिला चॅलेंज लीग 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येईल आणि त्यापूर्वी कदाचित महिला खेळाडूंचा सराव शिबीरही आयोजित केले जाईल.''

पुढील वर्षी महिलांचा वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यापुर्वी भारतीय महिला संघासाठी दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या वन डे मालिकेच्या आयोजनाचाही विचार सुरू आहे.  

टॅग्स :आयपीएल 2020महिला टी-२० क्रिकेटबीसीसीआयसौरभ गांगुली