आयसीसीच्या अधिकृत घोषणेची बीसीसीआयला उत्सुकता;टी-२० विश्वचषक आयोजनाविषयी होणार निर्णय

ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 01:18 AM2020-07-20T01:18:05+5:302020-07-20T06:20:02+5:30

whatsapp join usJoin us
BCCI eagerly awaits official ICC announcement; decision on T20 World Cup to be taken | आयसीसीच्या अधिकृत घोषणेची बीसीसीआयला उत्सुकता;टी-२० विश्वचषक आयोजनाविषयी होणार निर्णय

आयसीसीच्या अधिकृत घोषणेची बीसीसीआयला उत्सुकता;टी-२० विश्वचषक आयोजनाविषयी होणार निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेण्याबाबत सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) बैठक होणार आहे. यावेळी आयसीसी यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याबाबत अधिकृत घोषणा करील, अशी आशा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आहे. कारण विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय झाल्यानंतरच आयपीएलचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होईल.

ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. मात्र व्हिक्टोरिया राज्यात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने ऑस्ट्रेलियाने याआधीच टी-२० विश्वचषक आयोजनाबाबत असमर्थता दर्शविली होती. त्याचप्रमाणे, भारतातही कोरोनाची समस्या आणखी वाढल्याने अशा परिस्थितीत आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. जर सरकारची परवानगी मिळाली नाही, तर यंदाची आयपीएल यूएईमध्ये खेळविण्यात येईल.

याबाबत बीसीसीआयच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आशिया चषक स्पर्धा स्थगित करणे, हे पहिले पाऊल होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याआधीच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे, मात्र तरीही टी-२० विश्वचषक आयोजनाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.’

मिळालेल्या माहितीनुसार यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये २०२२ मध्ये आयोजित करण्याची शक्यता आहे. कारण भारताकडे २०२१ मधील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद असून हे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे देण्यास भारताची इच्छा नाही.
दुसरीकडे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना सप्टेंबरच्या अखेरीस होणाºया इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयारी करण्यास सांगितले आणि त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाची टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट झाले होते.

या दौºयासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या २६ सदस्यीय संघाची घोषणाही केली आहे. मात्र आयसीसीने सांगितले की, ‘इतक्या मोठ्या स्पर्धेबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी संभावित सर्व पर्यायांचा विचार करण्यात येईल.’ आयसीसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीला नववी टी-२० विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय सहजपणे घेता येणार नाही, कारण या स्पर्धेच्या आयोजनासाठी ऑस्ट्रेलियान सरकारमधील वरिष्ठ मंत्री खूप उत्सुक होते. आयसीसीच्या या बैठकीत काय निर्णय होतो. याकडे बीसीसीआयचे लक्ष लागून राहिले आहे.

पाकिस्तानसाठी मोठा धक्का

आशिया चषक स्पर्धेला मिळालेली स्थगिती एहसान मनी आणि त्यांच्या टीमसाठी मोठा झटका मानला जात आहे. त्यांच्याकडून नेहमीच बीसीसीआयच्या भूमिकेला विरोध होत होता. या स्पर्धेच्या आयोजनासाठी पीसीबी खूप उत्सुक आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार काही द्विपक्षीय मालिकांच्या आयोजनासाठी पीसीबी अन्य काही क्रिकेट बोर्डांच्या संपर्कात आहे. कारण इंग्लंड दौºयानंतर पाकिस्तान संघाकडे आणखी कोणतीही मालिका नाही.

Web Title: BCCI eagerly awaits official ICC announcement; decision on T20 World Cup to be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.