Join us  

आर्थिक मंदिचा BCCIला फटका; सौरव गांगुलीनं घेतला मोठा निर्णय

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. ही स्पर्धा न झाल्यास आयपीएल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 5:41 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. ही स्पर्धा न झाल्यास आयपीएल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे बीसीसीआयनं कॉस्ट कटिंगचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या बीसीसीआयनं आता मंडळाच्या खर्चात कपात करण्यास सुरूवात केली आहे. त्याचं पहिलं पाऊस म्हणजे बीसीसीआयनं आयपीएल विजेत्या संघांना देण्यात येणारी बक्षीस रक्कम निम्मी करण्याचा निर्णय घेतला. आता अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासावर संक्रातं येणार आहे.

कोरोनामुळे जगभरात आर्थिक मंदीचं सावट आहे आणि यात बीसीसीआयनेही खर्चात आखडता हात घेतला आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयनं त्यांच्या अधिकाऱ्यांना देशांतर्गत विमान प्रवास हा बिझनेस क्लासऐवजी इकोनॉमी क्लासमधून करण्यास सांगितले आहे. आता फक्त वरिष्ठ आणि कनिष्ठ संघाच्या निवड समितीचे प्रमुखच देशांतर्गत विमान प्रवास बिझनेस क्लासमधून करू शकणार आहेत. बीसीसीआयच्या महाप्रबंधकांनाही आता इकोनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिन जय शाह यांच्या मते देशांतर्गत विमान प्रवास बिझनेस क्लासमधून न करता इकोनॉमी क्लासमधून केल्यास बीसीसीआयचा बराच पैसा वाचेल. पण, विमान प्रवास ७ तासांपेक्षा अधिक असल्यास अधिकारी बिझनेस क्लासमधून प्रवास करू शकतात. पण, प्रवास ७ तासांपेक्षा कमी असल्यास निवड समिती प्रमुखांव्यतिरिक्त सर्व अधिकारी इकोनॉमी क्लासमधून प्रवास करतील.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?

Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय

#OnThisDay : सचिन तेंडुलकर युगाचा अंत अन् टीम इंडियाला गवसला नवा स्टार

... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना

...म्हणून आयसोलेशनमधील 'त्या' फुटबॉलपटूनं पत्नीच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवले!

कुणी घर घेत का घर... ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या घराचा लिलाव

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयकोरोना वायरस बातम्याआयपीएल 2020