नवी दिल्ली : आयपीएल मीडिया अधिकार संदर्भातील प्रतिस्पर्धी विरोधी घडामोडींसाठी भारतीय क्रिकेट नियाम मंडळावर (बीसीसीआय) भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) तब्बल ५२ करोड २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे याआधी २०१३ सालीही सीसीआयने बीसीसीआयवर दंडात्मक कारवाई केली होती.
या कारवाईची माहिती देताना सीसीआयने ४४ पानी आपला आदेश देताना म्हटले की, ‘ ५२ करोड २४ लाख रुपयांची रक्कम ही गेल्या तीन आर्थिक वर्षातील बीसीसीआयच्या संबंधित टर्नओव्हरच्या केवळ ४.४८ टक्के इतकी आहे.’ बीसीसीआयची गेल्या तीन आर्थिक वर्षातील (२०१३-१४, २०१४-१५ आणि २०१५-१६) सरासरी कमाई ११६४.७ करोड इतकी राहिली आहे. सीसीआयने म्हटले की, ‘आयोगाने केलेल्या अभ्यासामध्ये स्पष्टपणे माहिती मिळाली आहे की, प्रसारण हक्कांची बोली लावणाºया व्यावसायिकांच्या हितांशिवाय बीसीसीआयच्या आर्थिक हितांचा बचाव करण्यासाठी मुद्दामहून मीडिया अधिकार करारातून एक नियम वगळण्यात आला.’ फेब्रुवारी २०१३ सालीही सीसीआयने बीसीसीआयवर ५२ करोड २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. (वृत्तसंस्था)
Web Title: BCCI gets penalty of 52 crores
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.