भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळत आहेत. आयपीएल यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितली. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत आयपीएल होणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं आधीच केली होती. त्यांना केवळ केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा होती आणि आता तिही संपली आहे.
बीसीसीआयच्या माहितीनंतर 8 फ्रँचायझींनी खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी ANI ला सांगितले की,''आयपीएल यूएईत खेळवण्याची सरकारकडून मान्यता मिळाली आहे, परंतु अजुनीह अधिकृत कागदपत्रे आलेली नाहीत. येत्या काही दिवसांत परवानगी मिळेल, असे आम्हाला अपेक्षित आहे.''
यूएईत होणाऱ्या आयपीएलसाठी 20 ऑगस्टला बहुतेक संघ रवाना होणार आहेत. माजी विजेता चेन्नई सुपर किंग 22 ऑगस्टला रवाना होण्याची शक्यता आहे. काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या कोरोना चाचणीची तयारी केली आहे आणि प्रमुख शहरांतून ते यूएईला रवाना होणार आहेत. ''फ्रँचायझींनी PCR टेस्ट करून घेणे कधीही चांगले आणि निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन ते यूएईत दाखल होत असतील तर अतीउत्तम. त्यानंतर त्यांना बीसीसीआयच्या SOPनुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी 24 तासांत दोन कोरोना चाचणी कराव्या लागतील,''असे फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं सांगितले. ते पुढे म्हणाले,''दोन कोरोना चाचणी करणे अनिवार्य असताना काही फ्रँचायझी भारत सोडण्यापूर्वी चार चाचण्या करणार आहेत.''
महत्त्वाचे मुद्दे
- 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार लीग
- 10 डबल हेडर सामने ( 3.30 वाजता होतील सामने)
- दुबई, शाहजाह आणि अबुधाबी येथे होतील सामने
- महिला ट्वेंटी-20 चॅलेंज होणार, तीन संघांमध्ये चार सामने खेळवण्यात येणार
पाकिस्तानी सैन्याला सक्षम बनवा, बजेट वाढवा; अख्तर म्हणतो, गवत खाण्याचीही तयारी!
बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले
ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन
Electricity Bill : एकनाथ खडसेंना एक लाख रुपयांचं लाईट बिल; नाथाभाऊंचा पारा चढला!
Web Title: BCCI gets 'in principle' govt approval for IPL 2020 in UAE; official paper is yet to come
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.