WTC फायनल, वर्ल्ड कपच्या विचाराने BCCI चिंतीत, IPLच्या सर्व संघांना दिली WARNING

IPL 2023 तीन दिवसांनी सुरू होणार आहे, त्यानंतर टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि वर्ल्ड कप खेळला जाणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:12 PM2023-03-28T19:12:44+5:302023-03-28T19:14:00+5:30

whatsapp join usJoin us
BCCI gives warning to all teams before IPL 2023 starts read what they have said | WTC फायनल, वर्ल्ड कपच्या विचाराने BCCI चिंतीत, IPLच्या सर्व संघांना दिली WARNING

WTC फायनल, वर्ल्ड कपच्या विचाराने BCCI चिंतीत, IPLच्या सर्व संघांना दिली WARNING

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI warning to IPL teams: भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे हैराण झाला आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतींशी झुंजत आहेत. त्यात जसप्रीत बुमराहच्या नावाचाही समावेश आहे जो IPL-2023 मध्ये खेळू शकणार नाही. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक देखील भारतात आयोजित केला जाणार आहे आणि आयपीएल नंतर, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना देखील खेळला जाणार आहे. हे पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अत्यंत सावध झाले आहे. त्यामुळे बीसीसीआयने IPL फ्रँचायझींना त्यांच्या गोलंदाजांबाबत कडक सूचना दिल्या आहेत. बीसीसीआयने आपल्या करारबद्ध खेळाडूंबाबत हे निर्देश दिले असल्याचे समजते आहे.

BCCIची IPL संघांना वॉर्निंग

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सर्व आयपीएल फ्रँचायझींना वॉर्निंग दिली आहे की, बोर्डाच्या करारबद्ध खेळाडूंवर जास्त भार टाकू नये, कारण त्यांना थकवा येण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. बीसीसीआयने विशेषतः गोलंदाजांच्या बाबतीत सावध राहण्यास सांगितले आहे.

फ्रँचायझींशी बोलले खास लोक

वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) फिजिओथेरपिस्ट नितिल पटेल, भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनी सर्व फ्रँचायझींना झूम बैठकीत हा संदेश दिला. दोघांनीही सर्व फ्रँचायझींच्या प्रशिक्षक आणि फिजिओथेरपिस्टशी बोलून याबाबत सूचना दिल्या. बीसीसीआयला या वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी निवडलेल्या २० गोलंदाजांची चिंता आहे. बीसीसीआयला आशा आहे की त्यांच्यापैकी एकही खेळाडू जखमी होणार नाही.

वृत्तपत्राने आपल्या वृत्तात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, फ्रँचायझींना सांगण्यात आले आहे की भारतीय संघाच्या गोलंदाजांचा काळजीपूर्वक वापर करा आणि त्यांना नेटमध्ये जास्त गोलंदाजी करायला लावू नका. अधिकाऱ्याने सांगितले की, फ्रँचायझींना सांगण्यात आले आहे की खेळाडू मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत क्षेत्ररक्षण कवायती करू शकतात परंतु त्यांना जास्त ताण देऊ नये. यानंतर त्यांच्या गोलंदाजीचा वेळ वाढवला जाऊ शकतो.

या लोकांवर नजर

मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, दीपक चहर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. एकदिवसीय विश्वचषकापर्यंत या खेळाडूंना कोणत्याही प्रकारे दुखापत होऊ नये, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आयपीएल 31 मार्चपासून सुरू होत असून अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. यानंतर भारताला ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे.

Web Title: BCCI gives warning to all teams before IPL 2023 starts read what they have said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.