नवी दिल्ली : वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून आगामी महिला आयपीएलचे मीडिया अधिकार पाच वर्षांसाठी ९५१ कोटींत खरेदी केल्याची घोषणा बीसीसीआयने सोमवारी केली. महिला आयपीएलचे आयोजन मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होरू शकते. यात पाच संघांचा समावेश असेल शिवाय सर्वच सामने मुंबईत खेळले जातील. जागतिक हक्क हे तीन श्रेणीत असून त्यात टीव्ही, डिजिटल आणि संयुक्त अधिकारांचा समावेश आहे.
वायकॉम १८ ने संयुक्त अधिकारांसाठी यशस्वी बोली लावली. मीडिया हक्क २०२३ ते २०२७ पर्यंत वायकॉम १८ कडेच राहतील. पुरुष आयपीएलमध्ये तिन्ही अधिकार वेगवेगळे विकण्यात आले आहेत. पुरुष आयपीएलमध्ये वायकॉमने डिजिटल अधिकार २३.७५८ कोटींत खरेदी केले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
महिला आयपीएलचे आयोजन मार्चमध्ये महिलांच्या आयपीएल मीडिया हक्कांच्या शर्यतीत वायकॉम १८ व्यतिरिक्त झी, सोनी आणि डिस्ने स्टारदेखील सामील होते. पण ही शर्यत वायकॉमने जिंकली. महिला आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. स्पर्धा ३ ते २६ मार्च या कालावधीत होण्याची शक्यता आहे. या मोसमात फायनलसह एकूण २२ सामने खेळले जाऊ शकतात.
प्रत्येक सामन्याची किंमत ७.०९ कोटी शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘महिला आयपीएल मीडिया हक्क जिंकल्याबद्दल वायाकॉम १८ चे अभिनंदन. वायकॉमसोबत मीडिया अधिकारांतर्गत पाच वर्षांसाठी ९५१ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येक सामन्यासाठी ७.०९ कोटी रुपये खर्च येणार आहे. पुरुषांच्या आयपीएल २०२३-२७ चे मीडिया हक्क एकूण ४८,३९० कोटी रुपयांना विकले गेले.’