Join us  

बीसीसीआयने जीसीच्या प्रस्तावाला दाखविली होती ‘केराची टोपली’

याशिवाय सहभागी चार संघांनीदेखील आयपीएल यूएईतच व्हावे असा आग्रह धरला होता. मात्र, १३ वे पर्व किती सुरक्षितपणे पार पडले याकडे बीसीसीआयने चक्क डोळेझाक केली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 2:32 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलचे १४ वे पर्व अर्ध्यावर स्थगित होण्यास बीसीसीआय स्वत: जबाबदार असल्याचे बोलले जाते. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या (जीसी) प्रस्तावाला बीसीसीआयने केराची टोपली दाखविल्यामुळेच ही नामुष्की ओढवली. ‘देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलचे आयोजन यंदादेखील यूएईत करण्यात यावे, अशी विनंती करणारा लेखी प्रस्ताव ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखालील आयपीएल संचालन परिषदेने बीसीसीआयला दिला होता.

याशिवाय सहभागी चार संघांनीदेखील आयपीएल यूएईतच व्हावे असा आग्रह धरला होता. मात्र, १३ वे पर्व किती सुरक्षितपणे पार पडले याकडे बीसीसीआयने चक्क डोळेझाक केली. यावर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधीपर्यंत युएईला स्टँडबाय ठेवण्यात आले होते, असेही सूत्रांनी सांगितले. युएई हाच आयपीएलच्या गव्हर्निंग काैन्सिलचा पहिला पर्याय होता. त्यांनी बीसीसीआयला ही स्पर्धा युएईमध्ये शिफ्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता. इतके नव्हे तर एमिरेट्स क्रिकेट बोर्डलादेखील अलर्टवर ठेवण्यात आले होते. ईसीबी देखील आयपीएलच्या पुन्हा आयोजनाला तयार होते. ते देखील अगदी कमी कालावधीत; पण बीसीसीआयने त्या दृष्टीने पावले उचलली नाहीत. 

बीसीसीआयचे अधिकारी मात्र मी पाऊल टाकणार नाही, असा पवित्र घेत इतरांवर विसंबून राहिले. पाऊल टाकेल याची वाट पाहत बसले आणि तेथेच बीसीसीआयने स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला. बीसीसीआय सचिव जय शहा आणि कोषाध्यक्ष अरुण धुमल हे देखील आयपीएलच्या जीसीचे सदस्य आहेत.  

टॅग्स :बीसीसीआयकोरोना वायरस बातम्या