India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस

भारतानं सामना जिंकत मालिकाही घातली खिशात

By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 01:49 PM2021-01-19T13:49:14+5:302021-01-19T13:52:12+5:30

whatsapp join usJoin us
BCCI has announced INR 5 Crore as team bonus These are special moments for India Cricket India vs Australia | India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस

India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतानं सामना जिंकत मालिकाही घातली खिशातबीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी केलं भारतीय संघाचं कौतुक

India vs Australia, 4th Test Day 5 : संकटांवर मात करताना टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. अॅडलेडवरील '३६'च्या आकड्यानंतर टीम इंडिया असा कमबॅक करेल, याचा स्वप्नातही ऑस्ट्रेलियन संघानं विचार केला नव्हता. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल, रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी शानदार खेळ केला. भारतानं ३ विकेट राखून हा सामना जिंकला. भारतीय संघाच्या या विजयानंतर बीसीसीआयनंही संघाचं कौतुक केलं आहे. तसंच संघाला ५ कोटी रूपयांचा विशेष बोनसही जाहीर केला आहे. 

"बीसीसीआयनं भारतीय संघाला पाच कोटी रूपयांचा विशेष बोनस जाहीर केला आहे. क्रिकेटमधील काही निवडक आणि विशेष क्षणांपैकी एक हा क्षण आहे. भारतीय संघानं उत्तम खेळ आणि उत्तम कौशल्य दाखवलं आहे," असं ट्वीट बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी केलं.

मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी गोलंदाजीचं उत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाचा डाव २९४ धावांवर गुंडाळला. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाची २६ षटकं वाया गेली आणि पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 





पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १५ षटकांचा खेळ शिल्लक करताना टीम इंडिया बाजी मारेल असा विश्वास वाटत होता. पण, मयांक अग्रवालच्या विकेटनं ऑस्ट्रेलियन संघाला बूस्ट मिळवून दिला. मयांक ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. भारतानं ही मालिका २-१अशी जिंकून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. टीम इंडियानं गॅबा कसोटी जिंकून बॉर्डर-गावसकर चषक  सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे ठेवला. २०१७ ( भारत) आणि २०१८-१९ मध्ये भारतानं २-१ अशी मालिका जिंकली होती. २०२०-२१ मध्ये मालिका १-१अशी बरोबरीत सोडवून बॉर्डर-गावसकर चषक स्वतःकडे ठेवला.

Web Title: BCCI has announced INR 5 Crore as team bonus These are special moments for India Cricket India vs Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.