Join us  

८ ट्वेंटी-२०, ३ वनडे नि ५ टेस्ट! टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

बीसीसीआयने भारतीय संघाच्या आगामी १६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 7:49 PM

Open in App

आगामी काळात ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले असून सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १५ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या आगामी १६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूणच भारतीय संघ वन डे विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. टीम इंडियाच्या आगामी १६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यानुसार, भारतीय संघ ५ कसोटी, ३ वन डे आणि ८ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. 

वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. २२ सप्टेंबर, शुक्रवार - मोहाली, दुपारी १.३० वाजल्यापासून
  2. २४ सप्टेंबर, रविवार - इंदौर, दुपारी १.३० वाजल्यापासून 
  3. २७ सप्टेंबर, बुधवार - राजकोट, दुपारी १.३० वाजल्यापासून

ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. २३ नोव्हेंबर, गुरूवार - वायझॅग, सायंकाळी ७ वाजल्यापासून
  2. २६ नोव्हेंबर, रविवार, त्रिवेंद्रम, सायंकाली ७ वाजल्यापासून
  3. २८ नोव्हेंबर, मंगळवार, गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजल्यापासून
  4. १ डिसेंबर, शुक्रवार, नागपूर, सायंकाळी ७ वाजल्यापासून
  5. ३ डिसेंबर, रविवार, हैदराबाद, सायंकाळी ७ वाजल्यापासून

 

ट्वेंटी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानचा भारत दौरा

  1. ११ जानेवारी, गुरूवार - मोहाली 
  2. १४ जानेवारी, रविवार, इंदौर
  3. १७ जानेवारी, बुधवार, बंगळुरू

 

कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा भारत दौरा

  1. २५-१९ जानेवारी - हैदराबाद
  2. ०२-०६ फेब्रुवारी - वायझॅग
  3. १५-१९ फेब्रुवारी - राजकोट
  4. २३-२७ फेब्रुवारी - रांची
  5. ७-११ मार्च - धर्मशाला

 

टॅग्स :बीसीसीआयवन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध इंग्लंडटी-20 क्रिकेट
Open in App