इंडियन प्रीमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघाचे मिशन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे. विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले. आयपीएल २०२२मध्ये रोहित, विराट या प्रमुख खेळाडूंची कामगिरी समाधानकारक झालेली नसली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे परिणाम जाणवणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. मात्र, बीसीसीआयने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत भारतीय खेळाडूंची दमछाक करण्याचा घाट घातल्याचे दिसत आहे. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघासाठी आणखी एका मालिकेचे आयोजन केले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
- पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्ली
- दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटक
- तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाक
- चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
- पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू
भारत-आयर्लंड ट्वेंटी-२० मालिका
- २६ जून - पहिली ट्वेंटी-२०
- २८ जून - दुसरी ट्वेंटी-२०
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
ट्वेंटी-२० मालिका
- पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
- दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
- तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
वन डे मालिका
- पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
- दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
- तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड
बीसीसीआय आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारताची टीम बी पाठवण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. येथे २२, २४ व २७ जुलैला वन डे सामने होतील, तर २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत तीन ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील. पुढील दोन ट्वेंटी-२० सामने अमेरिकेत खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त Cricbuzz ने दिले आहे.
भारताचा विंडीज दौरा
- पहिली वन डे - २२ जुलै
- दुसरी वन डे - २४ जुलै
- तिसरी वन डे - २७ जुलै
- पहिली ट्वेंटी-२० - २९ जुलै
- दुसरी ट्वेंटी-२० - १ ऑगस्ट
- तिसरी ट्वेंटी-२० - २ ऑगस्ट
- चौथी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट
- पाचवी ट्वेंटी-२० - ७ ऑगस्ट