वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात सर्फराज खानला संधी न दिल्याचा विषय सध्या चर्चेत आहे. रणजी करंडक स्पर्धेत मागील तीन हंगामात सर्फराजने जवळपास १००च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वाधिक सरासरी ही सर्फराज खानची आहे. तरीही त्याच्यावर निवड समितीकडून अन्याय होत असल्याची भावना आहे. पण, त्याचा फिटनेस व वागणूक ही खूप मोठी समस्या असल्याचे मत बीसीसीआयच्या सूत्रांनी व्यक्त केली होती. आता हाती येत असलेल्या बातमीनुसार बीसीसीआयनेआयपीएल २०२३ मधील चार स्टार खेळाडूंना सुधरा अन्यथा भारताच्या ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा असा दम दिल्याचे वृत्त समोर येतेय.
'गौतम गंभीर जळकुटा, त्याला विराट कोहलीचं यश पाहवत नाही'; वाचा असं कोण म्हणतंय...
केळव कामगिरीच नव्हे तर मैदानावरील शिस्तही महत्त्वाची आहे आणि बीसीसीआय त्या दिशेने पाऊलं उचलताना दिसतेय. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० संघाची घोषणा अद्याप बीसीसीआयने केलेली नाही. आयपीएल २०२३ स्पर्धा गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना या दौऱ्यावर संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, त्यापैकी ४ खेळाडूंवर बीसीसीआय मैदानावरील वागणुकीमुळे नाराज आहे. निवड समितीनेही या चार खेळाडूंना सुधारण्याची संधी दिली आहे. सुधारणा न दिसल्यास IND vs WI T20 संघात संधी मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
Cricbuzzने दिलेल्या वृत्तनुसार बीसीसीआयने आयपीएल २०२३ मधील ४ स्टार खेळाडूंना नोटीस पाठवली आहे. या खेळाडूंची नावं अद्याप समोर आलेली नाहीत, परंतु यात सर्फराज खान असल्याची दबकी चर्चा रंगतेय. आयपीएल २०२३ मध्ये काही युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधले आहे.
भारत - वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० मालिकापहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)