Join us  

निवड समितीसाठी सचिन, धोनी, इंझमाम, सेहवागचे अर्ज; पण BCCI ने सर्वांना केले बाद, जाणून घ्या कारण 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर BCCI ने निवड समितीची हकालपट्टी केली आणि आता नवीन समितीसाठी अर्ज मागवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 6:38 PM

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर BCCI ने निवड समितीची हकालपट्टी केली आणि आता नवीन समितीसाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयकडे आतापर्यंत निवड समितीसाठी ६०० हून अधिक अर्ज आले आहेत आणि त्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक आणि भारतीय दिग्गज महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर यांच्या नावाचाही समावेश आहे, पण BCCI ने त्यांचे अर्ज बाद केले आहेत आणि त्यामागे मजेशीर कारण आहे.

दक्षिण विभागातून लक्ष्मण शिवरामाकृष्णन हे मागच्या वेळेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते आणि त्यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचा पाठिंबा होता. पण, आता ज्युनियर व सीनियर समितीत एकाच राज्याचे अध्यक्ष नकोय, म्हणून यंदाही लक्ष्मण यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे  या विभागातून वेंकटेश प्रसाद व दोड्डा गणेश हे शर्यतीत आहेत.  नवीन समिती जाहीर होईपर्यंत चेतन शर्मा, सुनील जोशी, देबाशिष मोहंती आणि हरविंदर यांच्याकडे जबाबदारी कायम आहे. नवीन निवड समिती आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडेल. 

पश्चिम विभागातून अजित आगरकर हे नाव पुढे होते, परंतु त्याने यावेळी अर्ज भरलेला नाही. सलिल अंकोला आणि समीर दिघे हे दोन स्पर्धक शर्यतीत आहे. मनिंदर सिंग, नयम मोंगिया, सलिल अंकोला आणि समीर दिघे यांची नावं पश्चिम विभागातून आघाडीव आहेत. मध्य विभाग व उत्तर विभागातून अनेक अर्ज आलेले आहेत. त्यापैकी अजय रात्रा, ग्यानू पांडे, अमय खुरसिया, मनिंदर सिंग, अतुल वासन, निखिल चोप्रा  व रतिंदरसिंग सोढी ही नावाजलेली नावं आहेत. पूर्व विभागातून शिव सुंदर दास, प्रभांजन मलिक, आरआर परीदा, शुभमय दास व एस लाहिरी हे शर्यतीत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षण नाईक यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीकडे इंझमाम-उल-हक, एम.एस. धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाचे  'बनावट' अर्ज प्राप्त झाले आहेत. चेतन शर्मा यांनी पुन्हा अर्ज केला आहे. चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांनी नियमानुसार त्यांच्या कार्यकाळ शिल्लक असल्याने समितीच्या पदासाठी अर्ज केला आहे.

सूत्रांनी पुढे सांगितले की सीएसीचे उच्च अधिकारी काही माजी क्रिकेटपटूंच्या संपर्कात आहेत, परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. सीएसी लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करतील, परंतु  माजी क्रिकेटपटूंपैकी एकही नवीन निवड समितीचा भाग असेल अशी अपेक्षा नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागमहेंद्रसिंग धोनी
Open in App