बीसीसीआयनं भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांच्या नावाची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे. ( BCCI has recommended the names of Mithali Raj and Ravi Ashwin for Khel Ratna Award)
ANIशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, आम्ही या शिफारशींबाबत चर्चा केली आणि चर्चेअंती अश्विन व मिताली यांचे नाव खेल रत्न पुरस्कारासाटी पाठवण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन याचे नाव पुन्हा पाठवण्यात येणार असून यावेळी त्याच्यासोबत लोकेश राहुल व जसप्रीत बुमराह ही दोन नावंही सुचवण्यात आली आहेत.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयानं मुदतवाढ दिली होती. याआधी 21 जून ही अखेरची तारीख होती. मागच्या वर्षी मनिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगाट, राणी रामपाल आणि मरियप्पन फंगावेलू यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.