Join us  

Rishabh Pant Accident: रिषभच्या कपाळावर दोन व्रण, गुडघ्याला मार अन् मनगट, पाय, पाठीला दुखापत; BCCIच मेडिकल बुलेटिन

BCCI Statement On Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 1:48 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे पंतला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. 

BCCIच मेडिकल बुलेटिनआता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक पत्रक काढून रिषभच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. "ऋषभ पंतच्या कपाळावर दोन व्रण आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्याला आणि उजव्या मनगटाला दुखापत झाली आहे. तसेच  घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीवर किरकोळ जखमा झाल्या आहेत.  ऋषभची प्रकृती स्थिर आहे, त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, जिथे त्याच्या दुखापतींचे प्रमाण शोधण्यासाठी आणि त्याच्या पुढील उपचारांचा मार्ग तयार करण्यासाठी एमआरआय स्कॅन केला जाणार आहे", अशी माहिती बीसीसीआयने पत्रकाद्वारे दिली. 

तसेच बीसीसीआय ऋषभच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे तर वैद्यकीय पथक सध्या ऋषभवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे. ऋषभला शक्य तितकी चांगली वैद्यकीय सेवा मिळावी आणि त्याला या अत्यंत त्रासदायक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मिळावे यासाठी बोर्ड लक्ष देईल, असे देखील बीसीसीआयने सांगितले.  

बीसीसीआय सहकार्य करणार पंतच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले, "माझ्या प्रार्थना ऋषभ पंतच्या पाठीशी आहेत कारण तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर संघर्ष करत आहे. मी त्याच्या कुटुंबीयांशी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करू."

रेलिंगवर आदळली कारप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या परिश्रमानंतर कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिल्लीहून रुरकीला येताना अपघातशुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता त्यावेळी हा अपघात घडला. रिषभ पंतचे घर रुरकीमध्येच आहे. त्याची कार नरसन शहराजवळ असताना गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रेलिंग, खांब तोडून कार उलटली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

टॅग्स :रिषभ पंतअपघातबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघहॉस्पिटल
Open in App