भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) कोणत्याही परिस्थितीत यंदा इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) खेळवण्यसाठी प्रयत्नशील आहे. कोरोना व्हायरसचे संकटातही बीसीसीआयला आयपीएल खेळवायची आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सर्व राज्य संघटनांना त्या संदर्भातले पत्र पाठवून तयारी करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयच्या या भूमिकेवर टीका होत आहे. खेळाडूंपेक्षा बीसीसीआयला पैसा प्रिय असल्याची टीका होत आहे. पण, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी आयपीएलमागचं अर्थकारण समजावलं.
डॅरेन सॅमीच्या वादात स्वरा भास्करची उडी; म्हणते, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी माफी मागावी!
संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना बीसीसीआयला केवळ आयपीएलचा विचार करत आहे, असा आरोप होत आहे. त्याला घुमाल यांनी उत्तर दिले. ते म्हणाले,''जी लोकं आयपीएलकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहतात, त्यांना या लीगमागचं अर्थकारण माहित नसाव. या लीगमुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि महसूलही निर्माण होतो.''
भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषाचे आरोप करणाऱ्या डॅरेन सॅमीची माघार; 'कालू'चा अर्थ उमगला
आयपीएल न होण्यामागचा तोटाही धुमाल यांनी समजावून सांगितला. ते म्हणाले,''आयपीएल न झाल्यास देशातील क्रिकेट स्पर्धा सुरू ठेवण्यास अवघड होईल. बीसीसीआयला यातून खूप महसूल मिळतो. आयपीएलमधून मिळणाऱ्या महसूलामुळे आम्ही वर्षभरात 2000 स्थानिक सामने खेळवू शकतो. स्थानिक ते कनिष्ठ स्तरावरील प्रत्येक क्रिकेटपटूवर त्याचा परिणाम होईल. ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्याची तयारी दर्शवली, तर आमची खेळण्याची तयारी आहे.''
जगातील सर्वात श्रीमंत WWE सुपरस्टार; कमाई ऐकून व्हाल थक्क!
आता Wide बॉलवर मिळणार फ्री हिट; ट्वेंटी-20 सामन्यात दोन पॉवर प्ले!