WTC तील पराभवानंतर BCCI लागली कामाला! निवडकर्ता पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 07:05 PM2023-06-22T19:05:46+5:302023-06-22T19:06:12+5:30

whatsapp join usJoin us
BCCI invites applications for one member of Men’s Selection Committee post, know here everything | WTC तील पराभवानंतर BCCI लागली कामाला! निवडकर्ता पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

WTC तील पराभवानंतर BCCI लागली कामाला! निवडकर्ता पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर सातत्याने टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला असून निवडकर्ता आणि फिजिओ पदासाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने गुरूवारी याबाबतची अधिकृत माहिती दिली. 

माजी निवडकर्ते चेतन शर्मा यांच्या रादीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. ३० जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. याबाबतची माहिती मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

काय असतील निवडकर्त्याची मुख्य कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या 

  • योग्य आणि पारदर्शक पद्धतीने सर्वोत्तम शक्य संघ निवडणे.
  • वरिष्ठ संघासाठी एक मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करणे. 
  • आवश्यकतेनुसार संघाच्या बैठकांना उपस्थित राहणे.
  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी प्रवास करणे.
  • बीसीसीआयने निर्देश दिल्यावर संघ निवडीबाबत माध्यमांना संबोधित करणे. 
  • प्रत्येक फॉरमॅटमध्ये संघासाठी कर्णधार नियुक्त करणे.
  • बीसीसीआयच्या नियमांचे पालन करणे.

निवडकर्ता पदासाठी आवश्यक अनुभव

  • अर्जदाराने किमान ७ कसोटी सामने खेळलेले असावेत. 
  • ३० प्रथम श्रेणीतील सामने.
  • १० वन डे आणि २० प्रथम श्रेणीतील सामने.
  • अर्जदाराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या किमान पाच वर्षे झाली असली पाहिजेत.
  •  जर कोणी गेल्या ५ वर्षांत कोणत्याही क्रिकेट समितीचा भाग असेल, तर तो या पदासाठी अर्ज करू शकत नाही.

  

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: BCCI invites applications for one member of Men’s Selection Committee post, know here everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.