भारतीय महिला क्रिकेट संघात मुख्य फिजिओथेरपिस्ट आणि प्रशिक्षकसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या पदांवर निवड झालेले उमेदवार खेळाडूंची कामगिरी सुधारण्यास मदत करतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
बीसीसीआयने भारतीय महिला संघासाठी दोन प्रमुख पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. पहिली पोस्ट मुख्य फिजिओथेरपिस्टसाठी आहे आणि दुसरी पोस्ट स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचसाठी आहे. या दोन्ही पदांवर काम करणारे लोक बेंगलोर येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये काम करतील. दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंना दुखापतीतून सावरण्यासाठी फिजिओ मदत करतील. यासाठी दररोज सत्रे घेतली जातील.
फिजिओथेरपिस्ट: पात्रतास्पोर्ट्स किंवा मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी/ स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज मेडिसिन/स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन या विषयात स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. फिजिओथेरपीमध्ये किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्ज करणाऱ्या फिजिओला संघ किंवा खेळाडूसोबत काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच: पात्रतास्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक खेळाडूंसाठी वॉर्मअपचे वेळापत्रक तयार करतील. तसेच ते खेळाडूंच्या तंदुरुस्तीचीही काळजी घेतील. यासाठी, त्यांच्यावर एक विशेष कार्यक्रम आखण्याची जबाबदारी असेल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदाराला संघ किंवा खेळाडूसोबत काम करण्याचा अनुभव देखील असावा