इंडियन प्रीमिअर लीगच्या यशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) २०२४ मध्ये नवीन T10 फ्रँचायझी लीग घेऊन येण्याच्या तयारीला लागले आहेत. आयपीएलचे १५ वर्ष यशस्वी आयोजन केल्यानंतर बीसीसीआय IPLची Tier-2 लीग म्हणून T10 चा प्रयोग करणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या लीगची ब्लू प्रिंट तयार असल्याचे वृत्त मनी कंट्रोलने दिले आहे. BCCI ने भविष्याचा विचार करता T10 फॉरमॅटकडे मोर्चा वळवला आहे, परंतु अद्याप बीसीसीआयकडून या वृत्ताला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. बीसीसीआयची खालील मुद्यांवर होणार चर्चा १ - T10 किंवा T20 - T10 फॉरमॅटचा प्रयोग करायचा किंवा ट्वेंटी-२० फॉरमॅटनुसारच पुढे लीग सुरू ठेवयाची, यावर चर्चा अपेक्षित२ - खेळाडूंची वयोमर्यादा - ही नवी लीग आयपीएलची प्रसिद्धी कमी करणार नाही याची खात्री करण्यासाठी T10मध्ये खेळाडूंसाठी वयोमर्यादा ठरवण्यावर चर्चा३ - फ्रँचायझी टेंडर प्रक्रिया - T10 लीगसाठी स्वतंत्र टेंडर प्रक्रिया राबवायची की आयपीएल फ्रँयाचझींनाच प्रथम प्राधान्य द्यायचे, यावर चर्चा४ - सामन्यांचे स्थळ - ही स्पर्धा भारतातील काही ठरावीक शहरांमध्ये खेळवायची किंवा दरवर्षी नवीन स्थळावर खेळवायची यावर चर्चा
काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियातील अरबपतीने भारतीय क्रिकेटमध्ये गुंतवणूकीसाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे T10 लीग गल्फ देशांमध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.