Join us  

IPL 2022 Schedule : आयपीएल २०२२ नियोजित वेळापत्रकाच्या एक आठवडा आधीच सुरू होणार; मुंबई-पुण्यात सामने खेळवणार, जाणून घ्या तारीख

IPL 2022 Schedule : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ साठी कोणते प्रमुख खेळाडू कोणत्या संघांकडून खेळणार हे आता स्पष्ट झाले आहे, आता उर्वरित संघबांधणी १२ व १३ फेब्रुवारीला होणाऱ्या IPL  2022 Mega Auctionमध्ये केली जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 4:32 PM

Open in App

IPL 2022 Schedule : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ साठी कोणते प्रमुख खेळाडू कोणत्या संघांकडून खेळणार हे आता स्पष्ट झाले आहे, आता उर्वरित संघबांधणी १२ व १३ फेब्रुवारीला होणाऱ्या IPL  2022 Mega Auctionमध्ये केली जाईल. BCCI नं आता आयपीएलच्या वेळापत्रकाच्या तयारीचं काम सुरू केलं आहे आणि यंदाची आयपीएल ही आधी ठरलेल्या तारखेच्या एक आठवडा आधीच सुरू करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यासाठी आज बीसीसीआयनं फ्रँचायझी मालकांसोबत बैठक  घेतली आणि त्यात काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली गेली. IPL 2022ला २७ मार्चपासून सुरूवात करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. 

Cricbuzz नं दिलेल्या वृत्तानुसार IPL 2022ला २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. कोरोना परिस्थिती पाहता आयपीएलचे सर्व सामने मुंबई/पुणे येथे खेळवण्याचाही विचार सुरू आहे. बीसीसीआयला ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्रातच खेळवायची आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहे. नुकतीच त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची या संदर्भात भेट घेतली होती. त्यात सकारात्मक चर्चा झाली. मुंबई व पुणे येथील कोरोना परिस्थिती जर स्पर्धेसाठी पोषक नसल्यात यूएई हा पर्याय बीसीसीआयनं ठेवला आहे. तिसरा पर्याय म्हणून दक्षिण आफ्रिकेचा विचार सुरू आहे. 

अहमदाबाद, लखनौ दोन नवीन संघ दाखल झाले अन् स्पर्धेचे नियम व स्वरूपही बदलले

असे असतील नवे नियम ( IPL 2022 New Rules and Format)

  • २०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल. 
  • दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
  • गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील
  • साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल.

 

 प्ले ऑफचे चार सामने  

  • क्वालिफायर १ - साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • एलिमिनेटर - तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • क्लालिफायर २ - क्वालिफायर १मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर मधील विजयी संघ
  • अंतिम सामना - क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २ 
टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआयमुंबईपुणेकोरोना वायरस बातम्या
Open in App