BCCI announces revised schedule for : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारताच्या वरिष्ठ संघाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहेत. टीम इंडिया आगामी काळात आपल्या मायदेशात बांगलादेश आणि इंग्लंडविरूद्ध मालिका खेळेल. १९ सप्टेंबरपासून भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. धर्मशाला येथे सलामीचा सामना नियोजित होता, मात्र आता बीसीसीआयने यात बदल केला आहे.
बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांच्या स्थळांची अदलाबदलीची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला ट्वेंटी-२० सामना कोलकाता येथे होईल. कोलकाता पोलिसांनी बंगालच्या क्रिकेट असोसिएशनला त्यांच्या प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या वचनबद्धता आणि दायित्वांबाबत केलेल्या विनंतीमुळे हे स्थळ बदलण्यात आले आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना धर्मशालाऐवजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. याशिवाय भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला ट्वेंटी-२० सामना कोलकाता आणि दुसरा सामना चेन्नई येथे पार पडेल.
बांगलादेशचा भारत दौरा१९-२४ सप्टेंबर - पहिला कसोटी सामना, चेन्नई२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, कानपूर६ ऑक्टोबर - पहिला ट्वेंटी-२० सामना, ग्वाल्हेर९ ऑक्टोबर - दुसरा ट्वेंटी-२० सामना, दिल्ली १२ ऑक्टोबर - तिसरा ट्वेंटी-२० सामना, हैदराबाद
इंग्लंडचा भारत दौरा २२ जानेवारी - पहिला ट्वेंटी-२० सामना, कोलकाता २५ जानेवारी - दुसरा ट्वेंटी-२० सामना, चेन्नई२८ जानेवारी - तिसरा ट्वेंटी-२० सामना, राजकोट३१ जानेवारी - चौथा ट्वेंटी-२० सामना, पुणे२ फेब्रुवारी - पाचवा ट्वेंटी-२० सामना, मुंबई६ फेब्रुवारी - पहिला वन डे सामना, नागपूर९ फेब्रुवारी - दुसरा वन डे सामना, Cuttack१२ फेब्रुवारी - तिसरा वन डे सामना, अहमदाबाद