इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास ( RCB) काही चांगला सुरू नाही... ८ पैकी ७ सामन्यांत त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला आणि २ गुणांसह ते तालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. आता स्पर्धेत कायम राहण्यासाठी त्यांनी उर्वरित सहा सामने जिंकण्यासोबतच इतरांच्या निकालांवर अवलंबून रहावे लागणार आहे. काल कोलकाता नाईट रायडर्सने १ धावेने त्यांचा पराभव केल्याने मार्गातील अडचणी आणखी वाढवल्या. त्यात अधिक भर पडण्याची शक्यता आहे. स्टार फलंदाज विराट कोहली याच्यावर BCCI एका सामन्याच्या बंदीची कारवाई करू शकते.
KKR ने रविवारी घरच्या मैदानावर RCBवर १ धावेने रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर फिल सॉल्टने डाईव्ह घेत RCB च्या शेवटच्या फलंदाजाला रन आऊट केले आणि विजय निश्चित केला. २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने २२१ धावांपर्यंत मजल मारली. हा सामना विराट कोहलीच्या विकेटवरून गाजला... हर्षित राणाच्या स्लोव्हर फुलटॉसवर विराट झेलबाद झाला, परंतु विराटच्या मते तो नो बॉल द्यायला हवा होता. त्यावरून किंग कोहलीने राडाही घातला. पण, नियमानुसार विराट बाद राहिला.
या नंतर विराटने अम्पायरच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली आणि अम्पायरसोबत वादही घातला. इतकेच नाही, पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना त्याने डस्टबिनवर जोरात बॅट आदळली. त्याच्या या कृतीवर बीसीसीआय कारवाई करू शकते आणि एका सामन्याची बंदीही घालू शकते.
कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने कोहलीच्या कृतीचा बचाव केला. “ नियम हे नियम असतात, विराट आणि मला वाटले की चेंडू कंबरेपेक्षा उंच आहे. मला वाटते की त्यांनी पॉपिंग क्रीजवरून मोजले आहे, एका संघाला वाटते की ते उंच आहे, दुसऱ्याला नाही,” असे फॅफ सामन्यानंतर