नवी दिल्ली : भारताचे अव्वल कसोटीपटू पुढील दोन महिने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) व्यस्त राहतील, पण जर या टी-२० स्पर्धेदरम्यान ते लाल चेंडूने सराव करण्यास इच्छुक असतील तर भारतीय क्रिकेट बोर्डाटी (बीसीसीआय) त्यांना ड्युक चेंडू उपलब्ध करुण देण्यासाठी तयारी आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाचा कसोटी कार्यक्रम बघता असे केल्या जाऊ शकते. भारताला आयपीएलनंतर १८ ते २२ जून या कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध साउथम्पटनमध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपची फायनल लढत खेळायची आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पण, हा पूर्णपणे पर्याय राहील ज्याचा बीसीसीआयसोबत करारबद्ध खेळाडूंना लाभ घेता येईल.बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘जर खेळाडूंना वाटते की त्यांना लाल चेंडूने सराव करायचा आहे, तर बीसीसीआय त्यांना लाल ड्यूक चेंडू उपलब्ध करून देईल. कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक लगेच त्यांना सहकार्य करतील.’ आयपीएल फायनल व विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल याच्यादरम्यान केवळ २० दिवसांचा फरक आहे. त्यामुळे बोर्डने हा पर्याय ठेवला आहे. अधिकारी म्हणाले, ‘विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी पूर्ण २० दिवसांचा कालावधी मिळणार नाही. जर आयपीएल २९ मे रोजी संपणार असेल तर संघ ३० किंवा ३१ मे रोजी दौऱ्यावर रवाना होणार असेल तर खेळाडूंना ब्रिटनमध्ये एका आठवड्याच्या कडक विलगीकरणात रहावे लागले. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे नेटमध्ये सरावासाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी असेल.’ न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्यानंतर विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये उतरणार आहे. तर भारतीय संघाला टी-२० लीगनंतर लगेच कसोटी सामन्यात खेळायचे आहे. इंग्लंडविरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना त्यांच्या फ्रँचायझी संघांकडून फार जास्त खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता नाही. अशा वेळी या कालावधीचा उपयोग ते कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी करू शकतात. त्याचप्रमाणे मोहम्मद शमी लाल ड्यूक चेंडूने गोलंदाजीचा सराव करू शकतो.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना आयपीएल दरम्यान सरावासाठी लाल ड्युक चेंडू मिळणार
कसोटी स्पेशालिस्ट खेळाडूंना आयपीएल दरम्यान सरावासाठी लाल ड्युक चेंडू मिळणार
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची विशेष योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 6:11 AM