मुंबई: ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत धूळ चारल्यावर आता भारतीय संघ इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. विराट कोहलीची अनुपस्थिती, अनेक खेळाडूंना झालेल्या दुखापती अशा परिस्थितीत भारतानं ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता पुढील महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघ मायदेशात कसोटी मालिका खेळेल.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. कसोटी सामन्यांवेळी स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात यावी यासाठी बीसीसीआयची केंद्र सरकारसोबत बातचीत सुरू आहे. केंद्र सरकार याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा बीसीसीआयला आहे. त्यामुळे कोरोना संकटात देशात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या साक्षीनं क्रिकेट सामना रंगेल. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धा उशिरा आयोजित करण्यात आली होती. त्यातही ही स्पर्धा दुबईत आयोजित केली गेली होती. या सामन्यांना स्टेडियममध्ये प्रेक्षक उपस्थित नव्हते.
अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं १८ खेळाडूंचा संघ जाहीर केला. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या पुनरागमन करतील. याशिवाय अक्षर पटेललादेखील संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या टी. नटराजनची निवड करण्यात आलेली नाही.
विराटनंतर शुबमन गिलच होणार भारताचा कर्णधार; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
मुख्य संघासोबतच चार अन्य खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये के. एस. भरत (यष्टिरक्षक), अभिमन्य ईश्वरन, शाहबाज नदीम आणि राहुल चहर यांच्या नावांचा समावेश आहे. मुख्य संघातील खेळाडूंना दुखापत झाल्यास या चार खेळाडूंचा विचार होईल. याशिवाय नेट गोलंदाज म्हणून अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गौतम आणि सौरभ कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे.
VIDEO: रिषभ पंत स्टम्पमागे गात होता भन्नाट गाणं; ऐकून पोट धरून हसाल...
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची निवड करण्यासाठी थोड्याच वेळापूर्वी निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीचे चार सदस्य उपस्थित होते. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण चार कसोटी सामने होतील. पहिला सामना ५ फेब्रुवारीला चेन्नईत खेळवला जाईल.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, के.एल. राहुल, आर. अश्विन, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
Web Title: bcci mulling to allow 50 percent crowds back for india england series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.