इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील मोसमात बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. खेळाडूंच्या अदलाबदली बरोबरच संघ संख्येत होणारी वाढ ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीची ठरणार आहे. पण, याहीपेक्षा आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) आयपीएलमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानुसार 2020च्या मोसमात 'Power Player' ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सामन्यासाठी मैदानावर उतरणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 15-15 जणांचा संघ जाहीर करावा लागणार आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की,''सामन्यापूर्वी संघांनी आपापले अंतिम 11 शिलेदार जाहीर न करता प्रत्येकी 15 खेळाडूंची नाव सांगावित. त्यानुसार विकेट गमावल्यानंतर किंवा सामन्यातील एका टप्प्यानंतर बदली खेळाडू मैदानावर उतरवला जाईल. ही संकल्पना आता आयपीएलमध्ये राबवण्याचा प्रयत्न आहे. याची चाचपणी आम्ही आगामी मुश्ताक अली चषक स्पर्धेत करणार आहोत.''
या संकल्पनेबाबत विस्तारानं सांगताना अधिकारी म्हणाले की,''Power Player मुळे सामन्यातील चुरस अधिक वाढणार आहे आणि हा निर्णय एखाद्या सामन्याला कलाटणी देणाराही ठरू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांनाही खिळवून ठेवता येईल. कल्पना करा की तुम्हाला 6 चेंडूंत 20 धावा हव्या आहेत आणि तुमच्या डग आऊटमध्ये आंद्रे रसेल बसला आहे. त्याला काही कारणास्तव अंतिम 11मध्ये स्थान दिलेले नाही. पण, या नव्या संकल्पनेमुळे तो ती सहा चेंडूं खेळण्यासाठी मैदानावर उतरू शकतो.''
KKRनं शेअर केलेल्या फोटोत लपलाय क्रिकेटपटू, बघा तुम्हाला सापडतोय का?
IPLचा कालावधी वाढणार, रात्रीस खेळ चालणार; बीसीसीआय लवकरच घोषणा करणार