BCCI NEW Selection Committee: टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयनं कठोर पाऊलं उचलायला सुरुवात केली. त्यात पहिली गदा ही चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर पडली अन् लगोलग बीसीसीआयने नव्या निवड समितीसाठी अर्ज मागवले. पण, Chetan Sharma यांनी पुन्हा निवड समितीसाठी अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत हरविंदर सिंग यांनीही पुन्हा अर्ज केला आहे. या दोन नावांसह भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद व दोड्डा गणेश यांनी नावं आघाडीवर आहेत. पाच सदस्यांच्या समितीसाठी बीसीसीआयकडे १०० अर्ज आले आहेत.
दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला अपयश आले. २०२१मध्ये साखळी फेरीतच गारद झालेला भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२२मध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. पण, संघ निवडीसाठी सातत्याने होत असलेल्या प्रयोगांचा भारतीय संघाला फटका बसतोय आणि त्यामुळेच BCCI ने ठोस भूमिका घेतली आहे. तरीही निवड समितीसाठी चेतन शर्मा व हरविंदर यांनी अर्ज केले.
- निवड समितीसाठी २८ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे
- नवीन समिती जाहीर होईपर्यंत चेतन शर्मा, सुनील जोशी, देबाशिष मोहंती आणि हरविंदर यांच्याकडे जबाबदारी कायम आहे
- नवीन निवड समिती आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडेल
दक्षिण विभागातून लक्ष्मण शिवरामाकृष्णन हे मागच्या वेळेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते आणि त्यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचा पाठिंबा होता. पण, आता ज्युनियर व सीनियर समितीत एकाच राज्याचे अध्यक्ष नकोय, म्हणून यंदाही लक्ष्मण यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे या विभागातून वेंकटेश प्रसाद व दोड्डा गणेश हे शर्यतीत आहेत.
पश्चिम विभागातून अजित आगरकर हे नाव पुढे होते, परंतु त्याने यावेळी अर्ज भरलेला नाही. सलिल अंकोला आणि समीर दिघे हे दोन स्पर्धक शर्यतीत आहे. मनिंदर सिंग, नयम मोंगिया, सलिल अंकोला आणि समीर दिघे यांची नावं पश्चिम विभागातून आघाडीव आहेत.
मध्य विभाग व उत्तर विभागातून अनेक अर्ज आलेले आहेत. त्यापैकी अजय रात्रा, ग्यानू पांडे, अमय खुरसिया, मनिंदर सिंग, अतुल वासन, निखिल चोप्रा व रतिंदरसिंग सोढी ही नावाजलेली नावं आहेत, पूर्व विभागातून शिव सुंदर दास, प्रभांजन मलिक, आरआर परीदा, शुभमय दास व एस लाहिरी हे शर्यतीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"