BCCI News: कोण होणार टीम इंडियाचे नवीन सलेक्टर्स..? 'या' 4 मोठ्या खेळाडूंचे नाव चर्चेत

BCCI News: T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर BCCIने चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवड समितीच्या पदांसाठी शुक्रवारी नव्याने अर्ज मागवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:26 PM2022-11-20T14:26:47+5:302022-11-20T14:27:02+5:30

whatsapp join usJoin us
BCCI News: nayan mongia, salil ankola, sameer dighe, ajit agarkar and Lsivaramakrishnan to apply for the national selectors job | BCCI News: कोण होणार टीम इंडियाचे नवीन सलेक्टर्स..? 'या' 4 मोठ्या खेळाडूंचे नाव चर्चेत

BCCI News: कोण होणार टीम इंडियाचे नवीन सलेक्टर्स..? 'या' 4 मोठ्या खेळाडूंचे नाव चर्चेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BCCI News: ICC T20 विश्वचषक-2022 मध्ये विजेतेपद गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला. BCCIने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त करून नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवले. यासाठी अनेक दिग्गज सज्ज झाले आहेत. दोन माजी यष्टिरक्षक आणि एक माजी वेगवान गोलंदाज यासाठी अर्ज करू शकतात, अशी माहिती आहे. याशिवाय एका माजी लेगस्पिनरचे नावही चर्चेत आहे. 

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी करून नवीन निवड समिती स्थापन करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारताचे माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया, समीर दिघे आणि सलील अंकोला निवड समितीमध्ये सामील होण्यासाठी अर्ज दाखल करतील. त्याचबरोबर माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन देखील निवड समितीसाठी अर्ज करू शकतात.

अजित आगरकरही अर्ज करणार?
गेल्या वेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर निवड समितीचा भाग होण्यापासून थोडक्यात मुकला होता. त्याच्या जागी मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज आणि त्याचा माजी सहकारी अभय कुरुविलाला चेतन शर्मासह निवड समितीमध्ये स्थान मिळाले होते. यावेळीही आगरकर अर्ज करू शकतो, अशी चर्चा आहे. पण, अद्यापतरी याला दुजोरा मिळालेला नाही.

मुख्य निवडकर्ता कोण असेल
शिवरामकृष्णन यांनी गेल्या वर्षीही अर्ज केला होता पण कर्नाटकचा डावखुरा फिरकीपटू सुनील जोशीने त्यांचा पराभव केला होता. यावेळी या लेगस्पिनरचा समितीत समावेश केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या नियमानुसार ज्या व्यक्तीला कसोटी सामना खेळण्याचा सर्वाधिक अनुभव असेल तो मुख्य निवडकर्त्याच्या खुर्चीवर बसेल. शिवरामकृष्णन यांनी नऊ कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मोंगियाने भारतासाठी 40 कसोटी आणि 140 एकदिवसीय सामने खेळले आहेत. अंकोलाने भारतासाठी एक कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो सध्या मुंबईचा मुख्य निवडकर्ता आहे.

Web Title: BCCI News: nayan mongia, salil ankola, sameer dighe, ajit agarkar and Lsivaramakrishnan to apply for the national selectors job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.