Rahul Dravid - BCCI : भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा करार संपुष्टात आला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ बरोबरच राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही कार्यकाळ संपला आहे. २०२१ ला झालेल्या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला. रवी शास्त्रीच्या जागी त्याने पदभार स्वीकारला. पण भारताचा World Cup 2023 फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर द्रविडची गच्छंती होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. तशातच आता क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने द्रविडला या पदावर कायम राहण्याची विनंती केली आहे.
यंदाचा विश्वचषक भारतात होता. भारताला या विश्वचषकावर नाव कोरण्याची चांगली संधी होती, पण ऑस्ट्रेलियाचा संघ त्यादिवशी वरचढ ठरला. त्यानंतर आता भारताच्या संघाला आगामी टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज व्हायचे आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची घडी बसली आहे. एका पॅटर्ननुसार भारतीय क्रिकेट बहरत आहे. अशा वेळी भारतीय संघाची बसलेली घडी विस्कटू नये हा विचार करून, द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचा व त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने ठेवला असल्याचे सांगितले जात आहे. द्रविड याबाबत काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, द्रविडच्या निर्णयावर आता साऱ्यांचे लक्ष आहे.
बीसीसीआय-द्रविड यांच्यात बैठक
माध्यमांतील वृत्तानुसार, आयपीएल फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्ससोबत (एलएसजी) राहुल द्रविडची चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत असल्यास द्रविड आयपीएल 2024 पूर्वीच LSGचा मेंटर बनू शकतो. मात्र, हे सर्व द्रविड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील संभाव्य बैठकीनंतरच निश्चित होईल. द्रविड कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात मागणी करेल, याची शक्यता फारच कमी आहे.
Web Title: BCCI offers to extend Rahul Dravid contract as head coach of Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.