Join us  

बीसीसीआयने युवराज सिंगला दिली होती निवृत्तीच्या सामन्याची ऑफर; पण युवी म्हणाला...

युवराज सिंगला मात्र बीसीसीआयने निवृत्तीचा सामना खेळण्याची ऑफर दिली होती, असे वृत्त काही मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. पण जर असे होते, तर युवराजने मैदानात निवृत्ती घेण्याचे का पसंत केले नाही, याचे उत्तर मिळत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 8:57 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताच्या काही माजी महान खेळाडूंना मैदानात निवृत्ती घेता आली नाही. पण युवराज सिंगला मात्र बीसीसीआयने निवृत्तीचा सामना खेळण्याची ऑफर दिली होती, असे वृत्त काही मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. पण जर असे होते, तर युवराजने मैदानात निवृत्ती घेण्याचे का पसंत केले नाही, याचे उत्तर मिळत नाही.

बीसीसीआय प्रत्येक खेळाडूची चाचणी घेत असते. बीसीसीआयने युवराजची यो-यो टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बीसीसीआयने युवराज सांगितले होते की, " जर तू यो-यो टेस्टमध्ये पास होऊ शकला नाहीस तर तुझ्यासाठी आम्ही निवृत्तीचा सामना ठेवू. " पण युवराजने मात्र या गोष्टीला साफ नकार दिला. कारण कोणाची आपल्यावर मेहेरबानी नको, असा युवराजचा विचार होता.

युवराजच्या नावावर 2007चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2011चा वन डे वर्ल्ड कप आणि 19  वर्षांखालील वर्ल्ड कप आहेत आणि हे तीनही वर्ल्ड कप जिंकणारा तो एक खेळाडू आहे. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. युवीनं 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मागील दोन वर्ष मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीला हा निर्णय जाहीर करताना भावनांवर नियंत्रण राखणे जड जात होतं. पत्रकारांशी संवाद साधताना त्याचा आवाज जड झाल्याचे ऐकू येत होते. पण, त्यानं मनावर दगड ठेवून हा निर्णय जाहीर केला. युवराजचा निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी नक्की नव्हता. निवृत्ती घेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच घेण्याचा विचार केला होता, असे युवीनं सांगितले.

टॅग्स :युवराज सिंगबीसीसीआय