भारतीय संघ यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिका खेळेल की नाही, याबाबत अजूनही स्पष्ट मत व्यक्त केलेलं नाही. टीम इंडिया 11 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर 18 ऑक्टोबरपासून ट्वेंटी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्यानंतर कसोटी व वन डे मालिका होणार आहे.
Video : हत्ती, गाय अन् आता बिबट्याची क्रूर हत्या; दात, नखंही ठेवली नाहीत!
पण, ट्वेंटी-20 मालिकेसाठी बीसीसीआय टीम इंडियाला पाठवण्यास फारशी उत्सुक नाही. त्यामुळे बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ट्वेंटी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यास सांगितले आहे. पण, हे सर्व ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्यावर करावी, अस बीसीसीआयचं म्हणणं आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार नसेल, तर ट्वेंटी-20 मालिकेसाठी आधीच ऑस्ट्रेलियात जाण्यात काही अर्थ नाही, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय 10 जूनला होणे अपेक्षित आहे.
''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार नसेल, तर तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडूंना पाठवण्यात काहीच अर्थ नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून या मालिकेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंचा अनावश्यक प्रवास आम्हाला टाळायचा आहे. वर्ल्ड कप न झाल्यास ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक कसोटी मालिकेच्या तारखांनुसार करावे. वर्ल्ड कप रद्द झाल्यास आम्हालाही द्विदेशीय मालिका खेळण्यास तारखा मिळतील,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप न झाल्यास बीसीसीआय त्या तारखांमध्ये इंडियन प्रीमिअर लीग खेळवण्याचा विचार करत आहे. आयपीएल स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटींचं नुकसान सहन करावा लागणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी
MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट
Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!
Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात
न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!
OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!
धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...