भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) बुधवारी २०२३-२४ साठीच्या वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. या यादीतून इशान किशन व श्रेयस अय्यर या दोन नावांना वगळण्यात आल्याने चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकवा असे सांगून भारतात परतलेला इशान वारंवार सूचना करूनही रणजी करंडक स्पर्धेत खेळला नाही. तेच श्रेयसनेही तंदुरुस्त असूनही रणजी करंडक स्पर्धेकडे कालपर्यंत पाठ फिरवली होती. खेळाडूंचे हे वर्तन BCCI ला आवडले नाही आणि त्यांनी कठोर पाऊल उचलताना या दोघांना करार दिला नाही. पण, या दोन्ही खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर पुन्हा करार मिळू शकतो, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
BCCI ने जाहीर केलेल्या करारातील शेवटची 'ओळ' अत्यंत महत्त्वाची; खेळाडूंना दिलाय सज्जड दम
बीसीसीआयच्या वार्षिक करारात नव्या खेळाडूंचा समावेशBCCI ने जाहीर केलेल्या नव्या वार्षिक करारामध्ये यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग व तिलक वर्मा या युवा खेळाडूंना स्थान देऊन त्यांच्या मेहनतीला एकप्रकारे पोचपावती दिली आहे. तेच दुसरीकडे इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी आयपीएल २०२४त खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवल्याने BCCI ने त्यांना करारातून वगळले. अय्यर हा B गटात होता, तर इशानचा C गटात समावेश होता. पण, नव्या करारात या दोघांच्या अनुपस्थितीने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. इशान किशन व श्रेयस अय्यर यांना पुन्हा करार मिळू शकतोदक्षिण आफ्रिकेतून मायदेशात परतलेला इशान कसोटी मालिकेकडे पाठ फिरवून आणि रणजी करंडक स्पर्धेला नजरअंदाज करून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यासोबत ट्रेनिंग करताना दिसला होता. त्याचप्रकारे श्रेयस अय्यर पुर्णपणे तंदुरुस्त असूनही रणजी करंडक स्पर्धेपासून दूर राहिला. पण, BCCI कारवाई करणारा याचा सुगावा लागताच त्याने स्वतःला रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुंबई संघासाठी उपलब्ध केले.
''निवड समितीला या दोन्ही खेळाडूंच्या क्षमतेबाबत कोणतीच शंका नाही, परंतु जर NCA सांगत असेल की तू तंदुरुस्त आहेत आणि तरीही तू स्वतःला कसोटी मालिकेसाठी उपलब्ध करत नसशील, तर मग तुम्हाला BCCI कसे करारात सहभागी करू शकतील? IPL नंतर जर या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय टीममध्ये निवड झाल्यास आणि त्यांनी प्रो राटा काँट्रॅक्टचे सर्व निकष पूर्ण केल्यास, त्यांना करार मिळू शकतो,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
यानुसार इशान व अय्यर यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. या दोघांनी आयपीएलला महत्त्व देताना देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केले होते.