मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मैदानावरील कामगिरीने नाही, तर वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. त्याने एका चाहत्याच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता. त्याचे हे विधान क्रिकेट चाहत्यांना फारसे आवडले नाही आणि त्यांनी त्याला सोशल मीडियावरून चांगलेच धारेवर धरले. भारतीय क्रिकेय नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) कोहलीचे कान टोचले. भारतीय चाहत्यांमुळेच तुला पगार मिळतो, पैसे कमावतोस, हे विसरू नकोस असे बीसीसीआयने कोहलीला सुनावले.
( Video : विराट कोहलीचा पारा चढला, चाहत्याला म्हणाला देश सोडून जा! )
व्हायरल झालेल्या व्हिडीओत कोहली मोबाईलवर काही तरी वाचताना दिसत आहे. भारतीय फलंदाजांच्या तुलनेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ अधिक आनंददायी असतो, असे एका चाहत्याने लिहिले. त्यावर कोहली म्हणाला,''तुम्ही भारतात राहू नका. तुम्हाला दुसरे देश आवडतात, मग तुम्ही आमच्या देशात का राहता?''
( दिलगिरी सोडा, विराट कोहलीने 'त्या' विधानावर दिली ही प्रतिक्रिया...)कोहलीची ही प्रतिक्रिया बीसीसीआयलाही आवडलेली नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,'' ते उत्तर म्हणजे मुर्खपणाच म्हणावे लागेल. त्याने असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. भारतीय चाहते गुंतवणूक करतात म्हणून कोहलीला पगार मिळतो, पैसे कमावतो, हे त्याने ध्यानात ठेवायला हवे.''