Join us  

बीसीसीआय लोकपालाचा करार संपला

लोकपाल आणि नैतिक अधिकारी डी. के. जैन यांचा वर्षभराचा करार फेब्रुवारीत संपला. त्यांचा करार वाढविण्याबाबत बोर्डाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:48 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) लोकपाल आणि नैतिक अधिकारी डी. के. जैन यांचा वर्षभराचा करार फेब्रुवारीत संपला. त्यांचा करार वाढविण्याबाबत बोर्डाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.सेवानिवृत्त न्या. जैन यांना फेब्रुवारी २०१९ ला वर्षभरासाठी लोकपालपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या कराराचे नूतनीकरण बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिव यांच्या भूमिकेवर विसंबून असेल. जैन यांनी बुधवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बोर्डाचे सीईओ राहुल जोहरी यांनी मला कराराचे नूतनीकरण करण्यात तुमची रुची आहे का, अशी मौखिक विचारणा केली होती. मी त्यांना होय म्हटले. लॉकडाऊन झाल्यापासून त्यांच्याकडून कुठलीही विचारणा झाली नाही. बीसीसीआयने लेखी विचारणा केल्यास मी अवश्य विचार करेन. लॉकडाऊनमुळे कार्यालय बंद असल्याने हितसंबंधांचे कुठलेही नवे प्रकरण माझ्याकडे आलेले नाही. याआधीची पाच प्रकरणे मात्र प्रलंबित आहेत. फेब्रुवारीत बीसीसीआयची बैठक पार पडली. त्यात लोकपाल पदाच्या नियुक्तीचा मुद्दा होता; मात्र या प्रकरणी कुठलाही निर्णय झाला नव्हता. (वृत्तसंस्था)