भारतीय क्रिकेटमध्ये सध्या इशान किशन हा चर्चेचा विषय बनला आहे.. मानसिक थकवा सांगून तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून विश्रांती मागतो काय आणि त्यानंतर त्याला निवड समितीत सातत्याने दुर्लक्षित करते काय... या सर्व घटनांमुळे काहीतरी गडबड नक्की आहे, याचा अंदाज बांधला जात आहे. त्यात BCCI ने राष्ट्रीय निवड समितीमधील महत्त्वाच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. अजित आगरकर सध्या निवड समितीचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या नेतृत्वाखालील सध्याच्या पाच सदस्यीय समितीमधून बदली करण्यात येणार्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख नाही. हाती आलेल्या वृत्तानुसार सलील अंकोला हा समितीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम विभागातून निवड समतीमध्ये दोन सदस्य असल्याने हे पाऊल उचलले जात आहे.
पात्रता निकषांमध्ये अर्जदारांची क्रिकेटची पार्श्वभूमी असावी, त्याने किमान सात कसोटी सामने, ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० वन डे सामने आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत. याव्यतिरिक्त, उमेदवाराने किमान पाच वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली असावी. याशिवाय त्याने की कोणत्याही क्रिकेट समितीवर पाच वर्षांच्या संचयी कालावधीसाठी सेवा केलेली नसावी.
विशेष म्हणजे, नोटीस कोणत्याही वयोमर्यादा नमूद केलेली नाही. अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील समितीने गेल्या वर्षी जबाबदारी स्वीकारली होती. २५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असल्याने, सर्वांच्या नजरा संभाव्य उमेदवारांवर आहेत. विद्यमान समितीमध्ये आगरकर, अंकोला, सुब्रतो बॅनर्जी, शिव सुंदर दास आणि एस शरथ यांसारख्या सदस्यांचा समावेश आहे. यात उत्तर विभागातून प्रतिनिधित्व नाही. सलील अंकोलाने १९८८-८९ च्या मोसमात देशांतर्गत क्रिकेट गाजवले. १९८९ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध पदार्पम केले आणि २ विकेट्स घेतल्या. परंतु त्याचा कसोटी प्रवास अचानक संपला. त्याने १९९८ मध्ये २८ व्या वर्षी निवृत्ती घेतली