नवी दिल्ली : वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याची ओरड करणाऱ्या क्रिकेटपटूंनी ‘वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती’ देण्यास चक्क नकार दिल्याने बीसीसीआय डोपिंगचा स्वीकार करणार की नाही, हे गुलदस्त्यात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कितीही ओरड केली तरी, बीसीसीआय नाडा (राष्ट्रीय डोपिंग एजन्सी)च्या नियमांचे पालन करण्याची शक्यता कमीच आहे.
या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी सिंगापूर येथील आयसीसी बैठकीत बीसीसीआयने वाडाच्या नियमांचे पालन करायला हवे, असे मत व्यक्त केले, तर काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी विपरीत मत नोंदविताना वाडाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आमसभेला असल्याचे स्पष्ट केल्याने, दोन्ही पदाधिकाºयांमधील मतभिन्नता चव्हाट्यावर आली आहे.
बीसीसीआयने नेहमीच वाडाच्या आचारसंहितेवर स्वाक्षरी करण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. यामुळे राष्टÑीय क्रीडा महासंघात समावेश होण्याची बीसीसीआयला भीती वाटते. बीसीसीआय शासकीय अनुदानदेखील घेत नाही. आयसीसीने क्रिकेटचा समावेश आॅलिम्पिकमध्ये करण्याचे ठरविले असल्याने, बीसीसीआयनेदेखील वाडा संहितेचे पालन करणे
अनिवार्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. (वृत्तसंस्था)
>सिंगापूर येथे आमच्या काळजीवाहू सचिवांनी व्यक्त केलेले मत बीसीसीआयच्या आमसभेचे नाही. आमसभा होईपर्यंत याबाबत कुठला ठोस निर्णय होईल, असे वाटत नाही. माझ्या मते, सीओएनेदेखील हा निर्णय आमसभेवर सोडण्याचे ठरविले आहे. हे प्रकरण गंभीर असून क्रिकेटपटू केंद्रस्थानी आहेत. क्रिकेटपटूंना विश्वासात घेतल्याशिवाय पदाधिकारी एकटे यावर निर्णय घेऊ शकणार नाहीत. - सी. के. खन्ना
Web Title: BCCI opposes doping - C K. Khanna
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.