Join us  

कोहलीच्या हट्टापुढे बीसीसीआय झुकली; पत्नीला विदेश दौऱ्यावर नेण्यास मुभा

नवी दिल्ली : क्रिकेटपटूंना विदेश दौºयावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास बीसीसीआयच्या प्रशासक समितीने (सीओए) परवानगी दिली. ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 6:04 AM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटपटूंना विदेश दौºयावर जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास बीसीसीआयच्या प्रशासक समितीने (सीओए) परवानगी दिली. विदेश दौºयातील सुरुवातीचे दहा दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला त्या खेळाडूसह राहता येणार नाही, ही मुख्य अट ठेवण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीने या मागणीसाठी बीसीसीआयपुढे गेल्या अनेक दिवसांपासून तगादा लावला होता. अखेर त्यास मंजुरी मिळाल्याने, कोहलीपुढे बीसीसीआय झुकली असल्याची चर्चा रंगत आहे.

सोओएने पहिल्या दहा दिवसांचा अपवाद वगळता यानंतर क्रिकेटपटंूसह त्यांची पत्नी किंवा प्रेयसी दौºयावर राहू शकते, असे बजावले. कोहलीने इंग्लंड दौºयावर पत्नी अनुष्का शर्माला सोबत नेले होते. तेव्हा कोहलीवर भरपूर टीका झाली होती. (वृत्तसंस्था)आॅस्टे्रेलिया संघाला झाला होता फायदा२०१५ मध्ये आॅस्ट्रेलियाने अ‍ॅशेससाठी खेळाडूंना पत्नी-प्रेयसीला सोबत नेण्याची परवानगी दिलेली. त्याचा त्यांना लाभ झाला. त्यानुसार हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विराटसह अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, चेतेश्वर पुजारा हे खेळाडू विदेश दौºयात पत्नींना सोबत घेऊन जातात.