इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी मोसमाबाबत नुकतीच गव्हर्निंग काऊंसिलची बैठक पार पडली. त्यानुसार यंदाची आयपीएल 29 मार्चला सुरू होणार असून 24 मे रोजी अंतिम सामना मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या 13व्या मोसमाची जोरदार तयारी सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिन आदित्य वर्मा यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. वर्मा यांनी पत्रातून भारतीयांना फायदा होणारा पर्यायही सुचवला आहे.
वर्मा यांनी लिहीले की,''न्यूयॉर्कच्या आयएमजी या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीला बीसीसीआय आयपीएलच्या एका सत्राच्या आयोजनासाठी 35 कोटी रुपये देते. बीसीसीआय आयपीएल आयोजनासाठी भारतीय कंपनीला का प्राधान्य देत नाही? ही इंडियन प्रीमिअर लीग आहे आणि त्यातून परदेशातील कंपनीएवजी भारतीयांना रोजगार मिळायला हवं.''
याशिवाय आयपीएलमधील संघ कोची टस्कर्स प्रकरणाचा लवकरात लवकर तोडगा काढा, असेही त्यांनी सांगितले. तसेच देशातील अन्य शहरांमध्येही आयपीएलचे काही सामने खेळवावे, अशीही विनंती त्यांनी केली. आयएमजी कंपनीनं आयपीएल आयोजनाच्या लिलाव प्रक्रियेतून हक्क मिळवले होते. जेव्हा आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेली, तेव्हा याच कंपनीनं बीसीसीआयकडून अधिक रक्कम घेतली होती. आयएमजीला पहिली पाच वर्ष आयपीएल आयोजनाचे हक्क मिळाले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा लिलाव प्रक्रियेत बाजी मारली. 2018मध्ये या कंपनीनं पुन्हा आयोजनाचे हक्क मिळवले.
आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...
हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य...
Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा
मुंबईत रंगणार आयपीएलचा अंतिम सामना; २४ मेला ठरणार विजेता