Sourav Ganguly Women's IPL: पुढील वर्षीपर्यंत महिला आयपीएल सुरू करण्याची योजना BCCI आखत आहे, अशी मोठी घोषणा BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं. यंदाच्या IPLमध्ये नेहमीप्रमाणे चार सामने खेळवण्यात येतील, असंही गांगुलीने स्पष्ट केलं. महिला आयपीएल सुरू न केल्याबद्दल भूतकाळात टीका झालेल्या बीसीसीआयला पुढील हंगामात लीग सुरू करण्यासाठी AGM मध्ये मंजुरी आवश्यक आहे. महिला IPL ची सुरूवात पुढच्याच वर्षापासून व्हावी असा BCCI चा प्लॅन आहे.
कसा असेल स्पर्धेचा फॉरमॅट?
BCCIच्या प्लॅनिंगनुसार, पुढील वर्षी महिला IPL चा पहिला हंगाम खेळवला जाईल. पहिल्या हंगामामध्ये पाच ते सहा संघ असतील, असा प्रस्ताव आहे. याशिवाय, महिला IPL चे संघ खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम पुरूष IPL मध्ये जे मालक आहेत, त्यांना विचारणा केली जाणार आहे. त्यांना सर्वप्रथम संघ खरेदी करण्यास नकार देण्याचा अधिकार दिला जाणार आहे. त्यानंतर गोष्टी पुढे सरकतील.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरूष संघाची मालकी असलेल्या चार फ्रँचायझींना WIPL मध्ये गुंतवणूक करायची इच्छा आहे. BCCI च्या प्लॅनिंगनुसार स्पर्धेचा फॉरमॅट समजून घेऊन त्यानंतर यावर विचार केला जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, "संपूर्ण महिला आयपीएलसाठी AGMने मंजूरी देणे आवश्यक आहे. पुढील वर्षीपासून ते सुरू करण्याचा आमचा विचार आहे." फेब्रुवारीमध्ये पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने २०२३ मध्ये महिला आयपीएल सुरू होणार असल्याचे सांगितले होते.
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनीही या मोसमात पुरुषांच्या आयपीएल प्ले-ऑफच्या आसपास महिला संघांचे चार सामने होणार असल्याचे स्पष्ट केले.
Read in English
Web Title: BCCI plans to start Womens IPL by 2023 this is the format reveals president Sourav Ganguly
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.