BCCI Players Contract : इशान किशन व श्रेयस अय्यर यांच्या देशांतर्गत क्रिकेटला दुलर्क्ष करण्याच्या वृत्तीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) कठोर कारवाई केली. बीसीसीआयने आज जाहीर केलेल्या खेळाडूंच्या करार यादीतून इशान व श्रेयस यांना वगळले. संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे, युजवेंद्र चहल, शिखर धवन व चेतेश्वर पुजारा आदींना करारात स्थान नाही दिले. श्रेयसने मागच्या वर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली होती, पंरतु त्याची चूक BCCI ने दाखवली. बीसीसीआयने आज जाहीर केलेल्या निवेदनातील शेवटची ओळ ही करार मिळालेल्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.वार्षिक खेळाडू रिटेनरशिप २०२३-२४ जाहीर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी २०२३-२४ हंगामासाठी ( १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ ) टीम इंडियाच्या वरिष्ठ संघासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले.
- A+ ग्रेड - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
- A ग्रेड - आर अश्विन, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.
- B ग्रेड - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
- C ग्रेड - रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.
सर्वात महत्त्वाचे....
- जे खेळाडू किमान ३ कसोटी किंवा ८ वन डे सामने किंवा १० ट्वेंटी-२० खेळण्याच्या निकषांची पूर्तता करतील त्यांना प्रमाणित कालावधीत आपोआप ग्रेड C मध्ये समाविष्ट केले जाईल. उदाहरणार्थ, ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान हे आतापर्यंत २ कसोटी सामने खेळले आहेत, त्यांनी धर्मशाला कसोटी सामन्यात भाग घेतल्यास त्यांना ग्रेड C मध्ये समाविष्ट केले जाईल.
- BCCI ने स्पष्ट शब्दात शेवटच्या ओळीत म्हटले आहे की, ज्या खेळाडूंना केंद्रीय करारामध्ये स्थान दिले गेले आहे, त्या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्यास प्राधान्य द्यावा लागेल.