आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळण्याची युवराज सिंगची ( Yuvraj Singh) संधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळामुळे ( BCCI) हुकली. जून २०१९मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवराजनं BCCIकडे पुनरागमन करण्यासाठी पत्र पाठवले होते. पण, परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूला इंडियन प्रीमिअर लीग किंवा स्थानिक स्पर्धांमध्ये खेळता येत नाही, असा नियम आहे. हाच नियम कोलकाता नाईट रायडर्सला दाखवून BCCIनं प्रविण तांबेला संघातून वगळण्यास सांगितले होते. प्रविण दुबईत झालेल्या T10 लीगमध्ये खेळला होता.
युवराजला हिरवा कंदील मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु BCCI नियमावर ठाम राहिले. २०१९मध्ये अंबाती रायुडूनंही निवृत्ती घेतली होती, पण तो स्थानिक क्रिकेटमध्ये परतला. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानच्या निवृत्तीनंतर रायुडू एकाही परदेशी लीगमध्ये खेळला नव्हता. त्यामुळे त्याला निवृत्ती मागे घेण्यासाठी BCCIच्या परवानगीची गरजच पडली नाही. युवराज मात्र निवृत्तीनंतर ग्लोबल ट्वेंटी-20 लीग कॅनडा व टी10 लीग मध्ये खेळला होता. BCCIनं परवानगी न दिल्यानं युवीचे चाहते नाराज झाले आहेत.
मुश्ताक अली ट्रॉफीत मनदीप सिंग पंजाब संघाचे नेतृत्व करणार आहे. गुरकिरत सिंग मान हा उपकर्णधार आहे. याशिवाय संघात संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे आणि बरींदर सरन यांचा समावेश आहे. अनमोलप्रीत सिंग व अष्टपैलू अभिषेक शर्माही संघात आहेत. भारताचा माजी गोलंदाजी मनप्रीत गोनी हा या संघाचा गोलंदाज प्रशिक्षक आहे. गोनीनंही काही नुकतीच निवृत्ती घेतली होती आणि तो ग्लोबल ट्वेंटी-20 लीग कॅनडात युवीसह खेळला होता.
पंजाबचा संघ - मनदीप सिंग, गुरकिरत मान, रोहन मारवाह, अभिनव शर्मा, प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग, अनमोल मल्होत्रा, सनवीर सिंग, संदीप शर्मा, करन कैला, मयांक मार्कंडे, अभिषेक शर्मा, रमनदीप सिंग, सिद्धार्थ कौल, बरींदर सरन, अर्षदीप सिंग, हरप्रीत ब्रार, बल्तेज धांडा, कृष्णा, गितांश खेरा.
Web Title: BCCI pours cold water on Yuvraj Singh's comeback plans, denies him permission to play Syed Mushtaq Ali Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.