Join us  

Jasprit Bumrah: "बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही", BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांचे मोठे विधान

जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषक खेळू शकतो असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 8:37 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे, अशा बातम्या मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. क्रिकेट वर्तुळातील अनेक मंडळींनी यावर आपापल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अशातच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक मोठे विधान केले आहे. जसप्रीत बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला नसल्याचे मोठे विधान गांगुलींनी केले आहे.

दरम्यान, विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर झाला आहे, अशा बातम्यांमुळे मागील दोन दिवस क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून दुखापतीचा सामना करत आहे. खरं तर दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला आशिया चषकातून देखील बाहेर व्हावे लागले होते. Ritzsport शी संवाद साधताना सौरव गांगुली यांनी म्हटले, "बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही, अजून काही वेळ शिल्लक आहे. आम्ही जसप्रीत बुमराहवर लक्ष ठेवत आहोत," अशा शब्दांत बीसीसीआय अध्यक्षांनी बुमराहबाबत सस्पेंस कायम ठेवला आहे. 

लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांचा टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार,  हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न१३ नोव्हेंबरला अंतिम सामना  

टॅग्स :जसप्रित बुमराहसौरभ गांगुलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2
Open in App