पाकिस्तानच्या यजमानात आशिया चषक खेळवला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने टीम इंडियाचे सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. अशातच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट देऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका या सामन्यांचा आनंद लुटला. आज बीसीसीआयचे अधिकारी मायदेशी परतले आहेत. तसेच पाकिस्तानने आगामी काळात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवावी अशी मागणी केली असल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले.
पाकिस्तानातून परतल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, हा दोन दिवसांचा दौरा आणि दोन दिवसांची भेट चांगली होती. तेथील राज्यपालांनी आमच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन केले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लोकांचा आदरातिथ्यही चांगला होता. त्यांची मागणी होती की, दोन्ही देशातील क्रिकेट पुन्हा सुरू झाले पाहिजे. पण यावर आम्ही म्हणालो की, ते सरकार ठरवेल आणि आमचे सरकार जे सांगेल ते आम्ही करू. ही केवळ क्रिकेट भेट होती आणि कोणताही राजकीय अजेंडा नव्हता.
"पाकिस्तानातील हा एक विलक्षण अनुभव होता. जसे आम्ही १९८४ मध्ये कसोटी सामना खेळलो तेव्हा आम्हालाही असाच आदरातिथ्य देण्यात आला. तिथे आम्हाला राजांसारखे वागवले जात होते, त्यामुळे आमच्यासाठी हा चांगला काळ होता. त्यामुळे आम्ही सर्व पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भेटण्यासाठी गेलो होतो. आम्ही तिथे भेट दिल्याने त्यांनाही आनंद झाला", असे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितले.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल