नवी दिल्ली : पाकिस्तानच्या यजमानात आशिया चषक २०२३ ची स्पर्धा खेळवली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेत सामने पार पडत आहेत. टीम इंडियाचे सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसार श्रीलंकेत होणार आहेत. अशातच BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे आशिया चषकासाठी पाकिस्तानला रवाना झाले आहेत. यासाठी त्यांनी अटारी-वाघा सीमा ओलांडली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. पंजाबमधील अमृतसर विमानतळावर पोहोचल्यानंतर राजीव शुक्ला म्हणाले की, हा दौरा राजकीय नाही. दोन दिवसांचा हा दौरा पूर्णपणे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आहे, यात राजकीय काहीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळावर माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले की, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ५ सप्टेंबरला पाकिस्तानातील गद्दाफी स्टेडियमवर सामना होणार आहे. यानंतर ६ तारखेला याच मैदानावर पाकिस्तानचा संघ सुपर-४ मध्ये खेळणार आहे. आशिया चषकाच्या चालू आवृत्तीत पाकिस्तानमध्ये होणारा हा शेवटचा सामना असेल. उर्वरित सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे होणार आहेत.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल