Join us  

Roger Binny: "विराटची पाकिस्तानविरूद्धची खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते" - रॉजर बिन्नी 

भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सचा पराभव करून उपांत्यफेरीकडे कूच केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:38 AM

Open in App

बंगळुरू : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवून विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव करून भारताने उपांत्यफेरीकडे कूच केली आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ऐतिहासिक खेळी केली होती, ती खेळीचे कौतुक करताना बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्या खेळीला प्रेक्षकांना एखाद्या स्वप्नाप्रमाणे अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले. विराटने पाकिस्तानविरूद्ध ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली होती. 

ती खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते - बिन्नी विराट कोहलीचे कौतुक करताना बिन्नी यांनी म्हटले, "ती खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते. कोहलीची ती अप्रतिम खेळी होती त्यामुळे भारताला विजय मिळाला. तुम्ही असे फार कमी सामने पाहिले असतील जे सुरूवातीपासून पाकिस्तानच्या बाजूने होते आणि अखेर भारत बाजी मारतो. विक्रमी संख्येने आलेल्या प्रेक्षकांना जे पाहायचे होते ते पाहायला मिळाले." बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे कर्नाटक येथे त्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

दरम्यान, अखेर माजी कर्णधाराने स्वत:ला सिद्ध केले का? या प्रश्नावर बिन्नी यांनी म्हटले,  विराट कोहलीला स्वत:ला सिद्ध करण्याची काहीच गरज नाही. तो एक स्टार खेळाडू असून त्याच्यासारखे खेळाडू दबावाच्या परिस्थितीत शानदार खेळी करतात. तसेच जेव्हा तुम्ही सामना हरता तेव्हा पराभव स्वीकारायला हवा आणि सामना ज्याप्रमाणे भारताने जिंकला ज्या प्रकारे खेळाडू खेळले त्याबद्दल कौतुक केले पाहिजे. असे बिन्नी यांनी नो-बॉलच्या वादावर म्हटले. 

किंग कोहलीची शानदार नाबाद खेळीपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला. 

बीसीआयची नवी टीम

  • अध्यक्ष - रॉजर बिन्नी ( कर्नाटक)
  • सचिव - जय शाह ( गुजरात) 
  • उपाध्यक्ष - राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश)
  • खजिनदार - आशिष शेलार ( महाराष्ट्र)  
  • सर चिटणीस - देवाजित सैकिया ( आसाम)
  • आयपीएल चेअरमन - अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)

 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२बीसीसीआयविराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App