Asia Cup 2023 : आशिया चषकापूर्वी मोठी घडामोड समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) विनंतीला मान देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सर्वोच्च अधिकारी आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, आशिया चषक स्पर्धेसाठी अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे पाकिस्तानात जाणार आहेत. हे दोघे ४ सप्टेंबरला वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात जाणार असल्याचे वृत्त Geo न्यूजने दिले आहे. पण, सुधारित माहितीनुसार हे शक्य नसल्याचे समजतेय.
टीम इंडियात सर्वात 'फिट' कोण? ना विराट, ना हार्दिक; युवा खेळाडूचे Yo-Yo Test मध्ये सर्वाधिक गुण
PCB आणि BCCI यांच्यातला वाद सर्वांना माहित्येय. पाकिस्तान या स्पर्धेचे अधिकृत यजमान आहेत, पण BCCI ने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याची ठाम भुमिका घेतली अन् आता भारतीय संघ त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. ही स्पर्धा मुलतानमध्ये ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. पीसीबीने आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल तयार केला अन् स्पर्धेला हिरवा झेंड मिळाला. हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तानमध्ये ४ सामने होतील आणि ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
नवीन अपडेट्स
इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी पाकिस्तानात जाणार नाहीत. ''पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आम्हाला निमंत्रण मिळालेलं आहे, परंतु सध्याच्या घडीला तिथे कोणीही जाण्याची शक्यता कमीच आहे. खेळाडूच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांनाही पाकिस्तानात जाण्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागले. आम्हाला अजून तरी अशी परवानगी मिळालेली नाही,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: BCCI President Roger Binny, Vice-President Rajiv Shukla to travel to Pakistan for Asia Cup upon PCB invitation, but some report say BCCI officials to boycott Pakistan visit for Asia Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.