कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ) चा 13 वा मोसम स्थगित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द झाल्यास त्या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) कंबर कसली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 25 सप्टेबंर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. पण, बीसीसीआयच्या योजनेवर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळ ( पीसीबी) पाणी फिरवण्याच्या तयारीत होते, परंतु आता त्यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे यंदा आशिया चषक ( ट्वेंटी-20) होणार आहे. पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद मिळालं आहे, परंतु भारताच्या विरोधामुळे ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं तसा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे ठेवला होता. त्यामुळे पीसीबीनं आयपीएल 2020साठी आशिया चषक स्पर्धेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. सप्टेंबर महिन्यात आशिया चषक होणार होता. पण, श्रीलंका क्रिकेट मंडळानं पीसीबीला तोंडघशी पाडलं आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं एका कार्यक्रमात बोलताना आशिया चषक रद्द असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे आयपीएलच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला आहे. पीसीबीनं श्रीलंकेकडे प्रस्ताव ठेवला होता, परंतु श्रीलंकेनं आशिया चषक आयोजनास नकार दिल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप मात्र झालेली नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो!
भारतीय क्रिकेटपटूंचा अॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा
वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!
'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...!
Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत
टीम इंडियाचा फलंदाज 'डोसा' घेऊन पोहोचला विराट कोहलीच्या घरी, अन्...