Join us  

टीम इंडिया चार देशांची वन डे सुपर सीरिज खेळणार; सौरव गांगुलीची मोठी घोषणा

भारतीय संघानं 2019च्या वर्षाची सांगता विजयानं केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवून मालिका 2-1 अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 12:59 PM

Open in App

भारतीय संघानं 2019च्या वर्षाची सांगता विजयानं केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवून मालिका 2-1 अशी खिशात घातली. 2007पासून ते आतापर्यंत टीम इंडियानं सलग दहा वन डे मालिकांमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करून एक वेगळा विक्रम नावावर केला. यापूर्वी टीम इंडियानं सलग नऊ वन डे मालिकांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते. टीम इंडिया 2020मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांचा सामना करणार आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मनात काही तरी वेगळाच प्लान आहे. गांगुली चार देशांची वन डे सुपर सीरिज खेळवण्याच्या विचारात आहे.

2021च्या सुरुवातीला चार देशांची वन डे सुपर सीरिज मालिका खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याची माहिती, अध्यक्ष सौरव गांगुलीनं दिली. या मालिकेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आखणी एक अव्वल संघ खेळेल, असं गांगुलीनं सांगितला. तो म्हणाला,'' ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि आखणी एक अव्वल संघ सुपर सीरिज मालिकेत खेळेल. या मालिकेची सुरुवात 2021 च्या सुरुवातीला होईल आणि ती भारतात खेळवण्यात येईल.''

या संदर्भात गांगुली आणि बीसीसीआयचे सदस्य इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाशी चर्चा करण्याकरिता काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये गेले होते. गांगुलीसोबत खजिनदार अरूण सिंग धुमाळ आणि सचिव जय शाह हेही होते. गांगुली म्हणाला,'' इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळासोबत आमचे चांगले संबंध आहेत आणि ही बैठक चांगली झाली.''

पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तीनपेक्षा जास्त देशांच्या वन डे मालिकेला मान्यता देत नाही. त्यामुळे गांगुलीच्या संकल्पनेतील मालिका झाल्यास तो एक इतिहास असेल. 

टॅग्स :बीसीसीआयसौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाइंग्लंडआयसीसी